आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : बाजारात चिल्लर पैशांची नेहमीच अडचण असते. एटीएममधूनही केवळ मोठी नोटच येते. चिल्लर पैसे नसल्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये भांडणेही होत असतात. मात्र, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीटेकच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या शीतल सुरासे आणि पूजा अकोलकर यांनी नोट देऊन चिल्लर मिळणारी यंत्रणा विकसित केली आहे. 
 
"नोट टू कॉइन एक्स्चेंज' असे या अॉटोमॅटिक यंत्रणेचे नाव आहे. नोटबंदीमुळे तसेच व्यवहारात चिल्लर पैशामुळे खूपच अडचणी यायला लागल्या. त्यामुळे सुटे पैसे देणाऱ्या अॉटोमॅटिक यंत्रणेची कल्पना शीतल पूजा यांच्या मनात आली. यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला. इंटरनेटवर माहिती शोधली. मशीन तयार करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात सुरुवात केली. 
 
अशीबनवली मशीन 
मशीनतयार करण्यासाठी त्यांनी इमेज प्रोसेसिंग याअंतर्गत मॅटलॅब साॅफ्टवेअरचा वापर केला. मॅटलॅब सॉफ्टवेअरमध्ये नोटांच्या इमेज घेण्यात आलेल्या आहेत. यानंतर एका कन्व्हेअर बेल्टवर नोट ठेवल्यास ती मशीनच्या आतमध्ये जाते.
 
पुढे गेल्यानंतर एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने तिचा फोटो घेऊन सॉफ्टवेअरकडे पाठविले जाते. या ठिकाणी टाकण्यात आलेली नोट खरी आहे की नाही याची तपासणी होऊन मूळ नोटेच्या सारखी असल्यास आपल्याला पुढील सूचना डिस्प्ले होतात.
 
 या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने किती रुपयांची नोट आहे याची ओळख होऊन किती सुटे लागतात त्याप्रमाणात एक रुपये, दोन रुपये, पाच रुपये अशा प्रकारची बटणे देण्यात आलेली आहेत. आपल्याला तेवढ्या पैशांचे सुटे अॉटोमॅटिक खाली पडतात. अशा प्रकारची यशस्वीरीत्या यंत्रणा त्यांनी तयार केली आहे. यासाठी डॉ. गणेश साबळे, एम. एस. खान यांचे मार्गदर्शन लाभले. 
बातम्या आणखी आहेत...