आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Abdul Sattar Critisize Narendra Modi For MIM

एमआयएम हे मोदींनीच पाठवलेले ‘पिल्लू’ !, आमदारांचे निलंबन हा गुजरात पॅटर्न : सत्तार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएम हे नरेंद्र मोदी यांनीच पाठवलेले पिल्लू असल्याचा आरोप सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. काँग्रेस आमदारांचे निलंबन हा मोदींचा गुजरात पॅटर्नच असल्याचेही सत्तार म्हणाले.
जिल्हा काँग्रेस आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनी काँग्रेसचे सर्व ५१ आमदार निलंबित केले होते. माझ्यासह काँग्रेसच्या ५ आमदारांचे निलंबन करून तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात आला, असे सत्तार म्हणाले.
विश्वास ठरावाविरुद्धच्या आंदोलनात प्रथमच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जमिनीवर बसले. माजी मुख्यमंत्री जमिनीवर बसतो तेव्हा काँग्रेसची सत्ता दूर नसते. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर हे सरकार फार काळ टिकणार नाही. आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांनाही पवारांनी सोडले नाही. त्यामुळे फडणवीसांचा पतंग काटण्यासाठी शरद पवारांना मांजाही लागणार नाही, असे ते म्हणाले.

मुस्लिमवाद मोदींचाच
एकीकडे संघवाल्यांनी घरोघर जाऊन हिंदुत्ववादाचे विष पेरले अन् दुसरीकडे एमआयएमने मुस्लिमवाद पुढे केला. मुस्लिमांना मुद्दाम हिंदूपासून दूर नेण्याचा हा प्रयत्न आहे.