आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इम्तियाज जलील यांच्या विरोधाला ‘अतुल’ उतारा, अखेर खासदार खैरे दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यासह शेजारी राज्यातील रुग्णांचा आधार असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (घाटी) अभ्यागत समितीच्या अध्यक्षपदाच्या राजकीय वादाने सोमवारी नवे वळण घेतले. एक महिन्यापूर्वीच अध्यक्ष झालेले खासदार चंद्रकांत खैरे यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली पूर्वीच सुरू झाल्या होत्या. त्याऐवजी स्थानिक आमदार या नात्याने एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील अध्यक्ष होतील, असे संकेत देण्यात आले होते. परंतु सोमवारी अतुल सावे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र आले. नव्या समितीत इम्तियाज यांचा अशासकीय सदस्य म्हणूनही उल्लेख नाही, हे विशेष.

पालकमंत्री रामदास कदम यांनी एक महिन्यापूर्वी या अध्यक्षपदासाठी खैरे यांच्या नावाची शिफारस केली. त्यानुसार समिती गठीत झाली. समितीवर इम्तियाज यांनाही स्थान देण्यात आले होते. खैरे हे केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध समित्यांवर आहेत. त्यामुळे ते घाटीसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे स्थानिक आमदार या नात्याने माझा विचार करावा, मी वेळही देईन अन् घाटीचा कायापालटही करेन, असे इम्तियाज यांनी कदम यांची भेट घेऊन सांगितले. त्यानंतर कदम यांनी इम्तियाज यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची तयारी चालवली होती. तसे पत्रही कदमांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. परंतु यास शिवसेनेकडून विरोध झाला. अखेर सोमवारी भाजपच्या बाजूने निर्णय झाला. शासनाने केलेल्या बदलाचे पत्र घाटी प्रशासनाला प्राप्त झाले असले तरी अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचे सावे म्हणाले.

तरीही अवमानच : खैरे यांना हटवून एमआयएमच्या आमदाराकडे या समितीचे अध्यक्षपद देणे म्हणजे खैर यांचा तो अवमान ठरेल, असे बोलले जात होते. परंतु अतुल सावेंकडे ते दिल्यानेही खैरेंचा अवमान केल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. हे अध्यक्षपद आमदाराकडेच असते असे संकेत असल्याचा युक्तिवाद केला जातो. जर असे होते तर खैरे यांच्याकडे हे पद आधी का देण्यात आले. तेव्हाच आमदाराच्या नावाचा विचार व्हायला हवा होता. त्यामुळे एमआयएमकडे हे अध्यक्षपद गेले नाही म्हणजे खैरेंचा अवमान झाला नाही, असे होत नसल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
अशी असेल अभ्यागत समिती
अध्यक्ष- अतुल सावे, अशासकीय सदस्य- संजय शिरसाट, उमेश काळे, आशा जाधव, साधना सुरडकर, डॉ. भागवत कराड, प्रल्हाद पारटकर, मुकुंद फुलारे, राम बुधवंत दिलीप कऱ्हाळे.
पुढे वाचा... शिरसाटांचाही पत्ता कट
बातम्या आणखी आहेत...