आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, आमदार अब्दुल सत्तार यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सिल्लोडला काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चासमोर बोलताना सत्तार.
सिल्लोड - मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या शेतक-यांच्या मोर्चासमोर केली.
शेतीमालाचे झालेले नुकसान, पाणीटंचाई, चाराटंचाई निर्माण झाल्याने सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयावर सत्तार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले असून तेथे शपथ घेण्यापेक्षा दुष्काळावर आधी मोर्चा काढल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. या वेळी रोहित्र गावपोच देण्यात यावे, सलग दहा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली.