आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ कोटींचा आमदार निधी गेला परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील तीन आमदारांनी गेल्या दोन आर्थिक वर्षांत जिल्हा नियोजन मंडळामार्फत विविध कामांसाठी कोटी २५ लाख रुपये दिले. त्यात पालिकेने तेवढेच पैसे टाकायचे होते. परंतु पालिकेने आपला वाटा उचलल्याने हे सव्वाआठ कोटी रुपये परत गेले. पालिकेने सव्वाआठ कोटींची तजवीज केली असती तर दोन वर्षांत साडेसोळा कोटींची कामे होऊ शकली असती.
गुरुवारी मनपाच्या सभेत माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी मनपा अायुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासमोर या आकड्यांची बेरीज मांडली. या पैशासाठी वेगळी तरतूद नव्हती, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. अन्य एखादे काम थांबवून सव्वाआठ कोटी रुपये उभे करता आले असते. नगरसेवकांचा स्वेच्छा निधीही यासाठी वापरता आला असता, असा नगरसेवकांचा सूर होता.
८. २५ कोटीतिन्ही आमदारांचा मिळून निधी
संजय शिरसाट
२०१४-१५ १.६५ कोटी
२०१५-१६ कोटी
इम्तियाज जलील
२०१४-१५ १.८५ कोटी
२०१५-१६ कोटी
अतुल सावे
२०१४-१५ १.७५ कोटी
२०१५-१६ कोटी
^प्रशासनाकडे नियोजननसल्याचा हा पुरावाच आहे. नगरसेवकांना आधी कल्पना दिली असती तर आमचा स्वेच्छा निधी देऊन साडेसोळा कोटींची कामे करता आली असती. -राजूशिंदे, नगरसेवक
^महानगर पालिकेकडे पैसेनाहीत. दुसरीकडे अधिकाऱ्यांना वेळ नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांसाठी विकास प्राधिकरण हवे. इम्तियाजजलील, आमदार, एमआयएम.
^नियोजन मंडळाकडूनआलेला निधी पुन्हा परत गेल्याने मी नियोजन केलेली कामे होणार नाहीत. पालिकेच्या तिजोरीत दमडीही नाही. शासनानेच यातून मार्ग काढावा. संजयशिरसाट, आमदार, शिवसेना.
^पालिकेकडे पैसेहीनव्हते आणि नियोजनही केले नाही. त्यामुळे ही रक्कम परत गेली. पुढील वेळी असे होणार नाही याचे नियोजन करावे. अतुल सावे, आमदार, भाजप.
बातम्या आणखी आहेत...