आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरे... खरे हिंदुत्ववादी असाल तर जिल्हा परिषदेतील सत्तेतुन बाहेर पडा - आ.हर्षवर्धन जाधव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- जिल्हा परिषदमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या जीवावर युती करून खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष केला आहे. खैरे प्रखर हिंदुत्ववादी असतील, तर कांग्रेसला सोडून सत्तेतुन बाहेर पड़ावे असे आवाहन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतात जावून शेतकऱ्याला दामदटी केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांचा पाठिंबा घेवून जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेने आपला जिल्हा परिषद् अध्यक्ष केला आणि त्यांच्याच विरोधात शिवसेनेकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, ही भूमिका दुटप्पी आहे. खैरे खरच हिंदुत्ववादी असतील तर जिल्हा परिषद् मधील कांग्रेस पक्षाचा पाठिंबा काढतील का? असा सवाल आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थितीत केला आहे. 

एकीकडे सत्तेत राहण्यासाठी कांग्रेस आमदार सत्तार यांच्याशी युती करायची आणी दूसरीकडे त्यांच्याच विरोधात रस्ता रोको करुन जनतेची दिशाभूल करायची हे चुकीचे आहे.
 हिंदुत्ववादासाठी सत्तेचा त्याग करणे ही शिवसेना पक्षाची ओळख असुन शिवसेनेने काँग्रेस पक्षाचा पाठिंबा न घेता जिल्हा परिषद् मधून बाहेर पडावे असे आवहान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
 
खासदार खैरे व आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात मोठया प्रमाणात पक्षीय वाद सुरु असुन तालुक्यात खासदार निधी फक्त कागदावर वापरल्याचा पुराव्यानिशि आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मागील काही दिवसापूर्वी केला होता. ते प्रकरण ताजे असतानाच आता या नव्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. 
 
शिवसेनेने पाठिंबा दिल्यास काँग्रेसची साथ सोडणार
मी मुळातच शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो असुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले मात्र खासदार खैरे यांच्या गटबाजीमुळे मला कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पंचायत समिती निवडणूक आघाडी स्थापन करून लढवावी लागली. यात पंचायत समितीत काँग्रेस पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिल्याने माझ्या आघाडीच्या सभापती झाला. अजूनही शिवसेने पाठिंबा दिल्यास शिवसेना पक्षाला उपसभापती पद देऊन कांग्रेस पक्षाचा पाठिंबा घेणार नाही. मात्र खासदार खैरे हे फक्त हिंदुत्वाचे ढोंग करतात सत्तेसाठी ते काहीही करु शकतात, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.