आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Harshvardhan Jadhav Send Resignation Letter To Chief Minister

आ. हर्षवर्धन जाधव यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा, वाचा काय लिहिले पत्रात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड : कन्नड-सोयगाव मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी (दि. २१) शहरातील संपर्क कार्यालयात पत्रपरिषद घेऊन सत्तेत असूनही विकासकामे होत नसल्याने आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगून तशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फॅक्सद्वारे पाठवल्याची माहिती दिली.

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील रस्ते, धरणे, विद्युतीकरण इत्यादी समस्यांच्या निवारणासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केले. डिसेंबर २०१४ च्या अधिवेशनापासून सतत राज्य सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत यातील पाच टक्केही काम झालेले नाही. सर्व प्रस्ताव मंत्रालयात पडून आहेत. जनतेने मला विजयी केले, आता या लोकांची स्वप्नपूर्ती करणे हे माझे कर्तव्य आहे. मात्र, राज्य सरकारच्या निरुत्साहीपणामुळे कोंडीत सापडललो आहे. घोषणांचा नुसता पाऊस पडत आहे, प्रत्यक्षात काहीच नाही. केंद्र सरकारच्या योजनाही महाराष्ट्र सरकार पदरी पाडून घेऊ शकलेले नाही, असेही पत्रात नमुद केले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाधव यांनी कोणती माहिती पाठविली... वाचा जशीच्या तशी....