आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चशिक्षित तरुणांना संधी देणार: इम्तियाज जलील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- येणा-या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणांना संधी देण्यात येईल. विकासाच्या मुद्द्यावरच एमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून दलित समाजाला सोबत घेऊन मताधिक्य मिळवू, असा विश्वास आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.
मंगळवारी मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, अब्दुल कदीर, सुनील वाघमारे उपस्थित होते. इम्तियाज पुढे म्हणाले, शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी असूनही शहर बकाल झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी स्वत:चे खिसे भरण्यापलीकडे या शहराचा िवकास केला नाही. रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. यात बदल घडवण्यासाठी एमआयएम पुढाकार घेईल.
मी आमदार झाल्यापासून सर्वसामान्यांशी निगडित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. घाटीमध्ये कमी पैशात एमआरआयची सुविधा िमळावी यासाठी आपणच सर्वप्रथम पुढाकार घेतला. नुकत्याच झालेल्या डीपीसी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पालकमंत्र्यांनी घाटीतील एमआरआयची सुविधा ७०० रुपयांत देण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. पत्रकारांसाठी संरक्षण कायदा व पेन्शनच्या प्रश्नावर सरकारदरबारी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असेे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

आमच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल-
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दलित पक्ष आमच्याशी सध्या बोलणी करीत आहेत. हिंदू उमेदवारांनी सुद्धा एमआयएमकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल. असे केल्यास मनपात जास्त उमेदवार निवडून येऊन दबावगट तयार करता येईल. शिवाय शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.