आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार जाधव मारहाणप्रकरणी चावरियांसह दहा जणांची चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांच्याताफ्यात गाडी घुसवल्यामुळे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना जानेवारी २०११ रोजी वेरूळ येथे पोलिसांनी जबर मारहाण केली होती. आघाडी सरकारच्या काळात याप्रकरणी काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता सत्ताधारी पक्ष शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा आमदारकी मिळवणाऱ्या जाधवांनी या पोलिसी अत्याचाराचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल१४३९ दिवस जुन्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत निवेदन देण्यासाठी म्हणून आमदार जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आपली कार घुसवण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी जाधव आणि पोलिसांची वादावादी झाली होती. पोलिसांनी जाधव यांना पोलिस ठाण्यात नेऊन जबर माराहाण केली होती. याविरोधात हर्षवर्धन जाधव यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, अशा प्रकारे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेले असता त्यांनी जाधव यांच्या बाजूने निकाल दिला होता. ही बाब आर. आर. पाटील यांच्या अनेकदा निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नव्हते. याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे जाधव यांनी अर्ज केला होता. त्यात दोषी पोलिसांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. यात सध्याचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्यासह कोकणे, पो. नि. फुंदे, अभिमन्यू पवार यांच्यासह दहा जणांची चौकशी होऊ शकते.