आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Kardile The Chief 4 Kotyatuna Retrieved From The Apartment Amol Jadhav

आमदार कर्डिले यांनी मुख्यमंत्री-कोट्यातून मिळवल्या 4 सदनिका- अमोल जाधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून मुख्यमंत्री कोट्यातील चार सदनिका (फ्लॅट) खोटे प्रतिज्ञापत्र करून मिळवले आहेत, अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, आमदार कर्डिले यांनी 1995 ते 2010 या काळात आमदार पदाचा गैरवापर करून मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून स्वत:च्या नावावर पुणे येथे 8 नोव्हेंबर 1995, अंधेरीत (मुंबई) 17 नोव्हेंबर 2000 रोजी पत्नी अलका कर्डिले यांच्या नावावर, पुणे येथे 27 सप्टेंबर 2007 रोजी पुतणी संगीता कर्डिले, स्वत:च्या नावे वर्सोवा (मुंबई) 10 जून 2009 रोजी सदनिका घेतल्या. त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र व एका कुटुंबास एकच सदनिकेबाबत असलेल्या पात्रतेच्या निकषाचे उल्लंघन करून या सदनिका मिळवल्या आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांना लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कार्यवाही झाली नाही.
मुंबई उच्च न्यायालयात 10 एप्रिल 20012 रोजी केतन तिरोडकर यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून एकापेक्षा जास्त सदनिका घेणारे राजकीय नेते, आमदार व त्यांच्या नातेवाईक यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे खोट्या सदनिका रद्द करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव यांनी निवेदनात केली आहे.