आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Mahadev Jankar Gave Lectures On Gopinathrao Munde

मुंडे इतरांची उंची वाढवत स्वत: शेवटपर्यंत संघर्षरत राहिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्व.गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेस उपस्थित नागरिक. इन्सेट: आमदार महादेव जानकर.)
औरंगाबाद- स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आमच्यासारख्या अनेकांची उंची वाढली, पण त्यांना शेवटपर्यंत संघर्षच करावा लागला. केंद्रात मंत्रिपद मिळवतानाही त्यांचा संघर्ष सुरूच होता. अनेक वेळा भाजपनेही त्यांना साथ दिली नाही, अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केली. तर स्व. मुंडे हे राजकारणातील गेम चेंजर होते, प्रस्थापित जातीय व्यवस्था संपवून त्यांनी बहुजन व्यवस्था प्रस्थापित केली, मात्र पंगा घेण्यात माहिर असलेले मुंडे उमदेपणामुळे यातून बाहेर पडले, असे "लोकसत्ता'चे माजी संपादक प्रवीण बर्दापूरकर म्हणाले.
मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहर भाजपतर्फे स्व. भानुदासराव चव्हाण सभागृहात आयोजित स्व. गोपीनाथराव मुंडे स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प जानकर बर्दापूरकर यांनी गुंफले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष भगवान घडामोडे होते. संयोजक डॉ. भागवत कराड या वेळी उपस्थित होते.
‘गोपीनाथराव संघर्ष’ या विषयावर बोलताना जानकर म्हणाले, स्वत: संघर्ष करणाऱ्या मुंडे यांनी सोशॅलिझमचा यशस्वी प्रयोग केला. आज मुंडे असते तर विधानसभेला युती तुटलीच नसती. मित्रपक्षही विखुरले नसते. मुंडेंनंतर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. मुंडेंनी मात्र वेगळा शब्द दिला असता. शब्दाला पक्के असणारे मुंडे आता राज्याचे मुख्यमंत्रीही झाले असते अन् मित्रपक्षही त्यांच्यासोबतच असते.
मुंबईत स्मारक अन् दिल्लीत लेनला नाव द्यावे
स्व.मुंडे यांचे फक्त औरंगाबादेतच स्मारक करून त्यांना मराठवाड्या पुरते मर्यादित करू नये. त्यांचे मुंबईतही भव्य स्मारक व्हावे अन् दिल्लीत एका लेनला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करू, असेही जानकर म्हणाले.
‘गोपीनाथराव मित्र’ या विषयावर बोलताना बर्दापूरकर म्हणाले, प्रस्थापित जातिव्यवस्था मोडीत काढत मुंडे यांनी बहुजनांतील जाती, पोटजाती राजकारणात सक्रिय केल्या. त्यासाठी त्यांना पंगा घ्यावा लागला. पक्षातील स्वत:च्या अस्तित्वासाठी पंगा घेतानाही डमगमले नाहीत. पक्षाला मोठे करताना कधी पक्षातील, तर कधी अन्य नेत्यांशी संघर्ष करावा लागला.