औरंगाबाद- शिवाजी हायस्कूलमधून इयत्ता नववी उत्तीर्ण असलेले शिवसेना उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे ६ कोटी, तर पत्नी सरोज यांच्याकडे ३ कोटींची मालमत्ता आहे. फॉर्च्युनर मोटारीची मालकी जैस्वाल यांच्याकडे असून पत्नी व मुलांकडे मिळून २ दुचाकी आहेत. १५ लाखांचे दागिने बाळगणाऱ्या या दांपत्याकडे शेतजमीन नाही.
जैस्वाल कुटुंबीयांच्या विविध ९ वित्तीय संस्थांमध्ये ठेवी असून त्यांच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज आहे. जैस्वाल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. स्थावर मालमत्तांमध्ये सायन मुंबई येथील सदनिका तसेच निराला बाजार येथील घराचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात ६ प्रकरणे न्यायालयात आहेत.