आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार मोटे यांच्या निवडीस आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- परंडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार राहुल मोटे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. काँग्रेसचे उमेदवार नुरुद्दीन चौधरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. गेल्या वर्षी १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक झाली. परंडा मतदारसंघातून काँग्रेसकडून नुरुद्दीन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल मोटे, तर शिवसेनेकडून ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रचारादरम्यान चौधरी हे सेनेचे डमी उमेदवार असल्याचा प्रचार करण्यात आला आणि त्याचा फटका बसल्याने निवडणुकीत पराभव पाहावा लागल्याचे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले आहे. खोटा प्रचार करून राहुल मोटे विजयी झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. एस. एस. काझी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अशोक गायकवाड, अॅड. मदार मुल्ला, अॅड. शेख सईद यांनी सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...