आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयएमसाठी आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट,आमदार संजय शिरसाट यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयआयएमसाठी औरंगाबाद हे योग्य ठिकाण आहे. पण या संस्थेला नागपूरला नेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय
शिरसाट यांनी केला. आयआयएम औरंगाबादला मंजूर करावे, या मागणीसाठी संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर, जयप्रकाश मुंदडा, हेमंत पाटील आदी मराठवाड्यातील
शिवसेनेचे आमदार शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे त्यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.
याबाबत शिरसाट म्हणाले, औरंगाबादकडून जागेचा तसेच विद्यापीठाकडून इमारतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शहरात सर्व सुविधा आहेत. केवळ मुख्यमंत्री नागपूरचे
असल्यामुळे ते नागपूरला नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आयआयएम औरंगाबादलाच व्हायला हवे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांिगतले.
पैठणचे आमदार संदिपान भुमरे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आयआयएम शहरातच व्हायला पाहिजे.

आयआयएमबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल सावे यांनी व्यक्त केली. स्वत: मुख्यमंत्र्यांनीदेखील याबाबतचा निर्णय झाला
नसल्याचे सांिगतले. त्यामुळे आयआयएम औरंगाबादलाच व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. आमदार प्रशांत बंब म्हणाले, आयआयएम
तसेच लॉ कॉलेजसंदर्भात आम्ही आग्रही भूमिका मांडणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले, आयआयएमसाठी मी लक्षवेधी मांडणार आहे.
आयआयएमसाठी विद्यार्थी तसेच सामजिक संघटनांनी मिळून लढा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, यासंदर्भात मी
लक्षवेधी उपस्थित केली असून उद्या सर्व आमदारांसोबत मीसुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.