आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाराखडी’ शिकणारांनी पवारांविषयी बोलू नये; चव्हाण यांचे बंब यांना प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘शरद पवारांविषयी बोलले की माध्यमातून प्रसिद्धी मिळते. स्वपक्षात किंमत वाढते आणि मोठ्या पदांची स्वप्न पडू लागतात. मात्र ज्यांना राजकारणाची बाराखडी अद्याप उमगली नाही अशांनी पवार यांच्याविषयी बोलू नये,’ अशी खोचक टीका राष्ट्रवादी प्रवक्ते अामदार सतीश चव्हाण यांनी केली.

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी नुकतेच ‘पवारांच्या विधानांचा परिणाम नाहीच, फक्त चर्चा होते’ असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना चव्हाण म्हणाले, ‘राज्यात आघाडी सरकार असताना बंब यांनी आपल्या हातावर ‘घड्याळ’ बांधले होते. त्यामुळे शरद पवारांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे. पवारांचे कार्य महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश जाणतोच. राज्य दुष्काळात होरपळत असताना पंतप्रधान परदेशाचे दौरे करत फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या वेदनेपोटी पवारांसारख्या सहृदयी नेत्याने सरकारविषयी खंत व्यक्त करणे साहजिकच होते. मात्र बंब यांनी पवारांविषयी बोलून आपल्या प्रसिद्धीलोलूप वृत्तीचे दर्शन घडवले असून त्यांनी आपली राजकीय ‘उंची’ पाहून या पुढे विधाने करावीत,’ असा सल्लाही चव्हाण यांनी दिला.

पवारांवर टीका करण्यापेक्षा अामदार बंब हे मराठवाड्यासाठी मंजूर झालेले मात्र आता विदर्भाकडे वळवण्यात आलेले आयआयएम, आयसीसी, लॉ स्कूल, ‘साई’चे विभागीय केंद्र आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सरकार दरबारी भांडले असते तर ते मराठवाड्याच्या हिताचेच ठरले असते, असा टाेलाही चव्हाण यांनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...