आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रिकेवर नाव टाकले नाही म्हणून, "त्या' अधिकाऱ्यांविरुद्ध आ. चव्हाणांचा हक्कभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आैरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या सुधारणा कामाच्या शुभारंभ समारंभ पत्रिकेवर नाव टाकले नाही म्हणून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
राज्य मार्ग क्रमांक च्या सुधारणा कामाचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामाच्या शुभारंभ पत्रिकेवर आ. चव्हाण यांचे नाव नव्हते. यासंबंधी विधिमंडळातून वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पत्रिकेवर चंद्रकांत पाटील, हरिभाऊ बागडे, आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, खा. रावसाहेब दानवे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आदींची नावे होती. आ. चव्हाण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे आदींची त्यावर नावे नव्हती. उपरोक्त प्रकरणात सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर सुखदेवे, अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी मुख्य अभियंता प्रवीण किडे यांच्याविरुद्ध विशेष हक्क समितीकडे अवमान केला म्हणून प्रकरण पाठवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...