आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सत्तारच ठरले जिल्हा काँग्रेसचे कारभारी, शहराची धुरा नामदेव पवारांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्याच्या काँग्रेसची धुरा कोणाकडे दिली जाईल, याचे उत्तर मंगळवारी मिळाले. अनेकांचा विरोध असूनही प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडेच जिल्ह्याचा कारभार सोपवण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील मराठी लॉबी नाराज होणार नाही, याचीही खबरदारी पक्षाने घेतली अन् शहराची धुरा कन्नडचे माजी आमदार नामदेव पवार यांच्याकडे सोपवण्यात आली.
जिल्हा शहराध्यक्षांची नियुक्ती लवकरच होणार असे गेल्या वर्षापासून सर्वांच्या कानी येत होते. वेगवेगळी नावे चर्चेत होती. जिल्हाध्यक्षपदासाठी सत्तार यांचे नावही तेव्हाच पुढे आले होते. परंतु एमआयएम या पक्षाला शहरात शह देण्यासाठी चांगला मुस्लिम चेहरा दिला जाईल, अशी अटकळ होती. मात्र सत्तार यांना जर जिल्हाध्यक्ष करायचे असेल तर शहराध्यक्ष हा मराठाच हवा, अशी जोरदार मागणी होती. सामाजिक नाराजी नको म्हणून पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष सत्तार यांच्याकडे देताना शिवसेनेतून पक्षात आलेल्या पवार यांच्याकडे शहराची धुरा सोपवली. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त करतानाच ज्या मतदारसंघात शहराचा काही भाग आहे, त्याचे नेतृत्व करणारे डॉ. कल्याण काळे काय वाईट होते, असा सवाल केला.

जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आमदार सुभाष झांबड यांचेही नाव होते. त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी घेण्यात आले. मावळते जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांना प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना संघटनेत काम करण्याची इच्छा होती. परंतु त्यांना कोठेही जागा देण्यात आली नाही.

स्व.विलासराव समर्थकांचा पत्ता कट
जिल्हाशहराध्यक्ष निवडीबरोबरच प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या समर्थकाचा पत्ता कट करण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्यातून चौघे
उपाध्यक्ष केशवराव औताडे. सरचिटणीसपदी अरुण मुगदिया, चिटणीसपदी आमदार सुभाष झांबड, अशोक सायन्ना यादव आणि समशेरसिंग सोदी.

पारखेंना पक्षाचानिर्णय मान्य
स्पष्टवक्तेअशी ख्याती असलेले आणि स्व. विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांची प्रतिक्रिया पक्षाच्या निर्णयावर बोलकी अशीच होती. ते म्हणाले, पक्षाचा निर्णय अगदी योग्य आहे. स्व. देशमुख यांचे कार्यकर्ते आता जिल्ह्यात उरले कोठे? ते गेल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे मार्ग निवडले. त्यामुळे त्याच्या समर्थकांना न्याय देण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षाने जो काही निर्णय घेतला तो योग्यच आहे आणि त्याला माझे समर्थन आहे. विशेष म्हणजे एका जाहीर कार्यक्रमात पारखे सत्तार यांचे जोरदार वाद झाले होते. त्या वादानंतर स्व. देशमुख यांनी पारखे यांना २००९ मध्ये औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

लवकरच घरवापसी
काँग्रेसमध्ये आता अच्छे दिन नक्कीच येतील. नाराज जे पक्षाला सोडून गेले होते, अशा सर्वांची घरवापसी केली जाईल. पक्षाला गतवैभव मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. अब्दुल सत्तार, नूतनजिल्हाध्यक्ष.

एमआयएमचे आव्हान नाही
नव्या नियुक्त्यांमुळे काही नाराजी अवश्य असेल. ती दूर केली जाईल, सर्वांना सोबत घेऊन काम करू. पक्षाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणायचे आहे. एमआयएम या पक्षाचे मला मुळीच आव्हान वाटत नाही. नामदेव पवार, नूतनशहराध्यक्ष.