आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सावे, शिरसाटांचे देव पुन्हा पाण्यात; मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशेने दोघांची फील्डिंग जोमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या महिनाभरापासून झालेल्या वेगवेगळ्या आरोपांनंतर भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला अन् त्यापाठोपाठ मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली. त्याच क्षणापासून पूर्वचे भाजपचे आमदार अतुल सावे आणि पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागेल, अशी आशा या दोघांनाही पूर्वीपासून होती आणि आहे. मात्र शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर वेळोवेळी मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला. मात्र खडसे बाहेर पडल्यानंतर आता त्यांच्या जागेवर नव्या मंत्र्याला सरकारमध्ये घेतले जाणार हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर भाजपच्या मंत्र्यांचे खांदेपालटही अपेक्षित असून भाजपबरोबरच शिवसेनेच्या कोट्यातील अन्य मंत्रिपदे भरली जातील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच सावे शिरसाट यांनी राज्यमंत्रिपदासाठी नेटाने फिल्डिंग लावल्याचे दिसते.

सावे यांनी नुकतीच दिल्लीवारी केली असून त्यात त्यांना काय आश्वासन दिले हे समजू शकले नाही. इकडे शिरसाट यांनी अनेक महिन्यांपासून आपला रेटा वाढवला आहे. जेव्हा केव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला सेनेकडून मंत्रिपद दिले जाईल आणि शिरसाट यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. या निमित्ताने शिरसाट यांनीही आता नव्याने प्रयत्न चालवले आहेत.
पुढे वाचा...
>जिल्ह्याला मंत्रिपद मिळणारच?
>शहराला फायदाच
बातम्या आणखी आहेत...