आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी रिक्षा चालवायचो, आता माझी मुलगी विमान!; आमदार शिरसाट यांनी मांडला सांगितला संघर्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळेत असताना कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी भाजी विकली. शाळेतून घरी आल्यावर गॅसचे फुगे विकले. मोठा झाल्यावर अॉटोरिक्षा चालवली. आता आमदार झालो. रिक्षा चालवणाराची मुलगी आता विमान चालवते. त्यामुळे मुलांनो, न्यूनगंड बाळगू नका. कठोर परिश्रमाच्या माध्यमातून तुम्हीही यशोशिखरावर जाणारच आहात, अशी ऊर्जा आमदार संजय शिरसाट यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांमध्ये भरली. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभाग आणि युनिसेफच्या वतीने जागतिक बाल दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांचा संवाद कार्यक्रम सोमवारी झाला त्या वेळी ते बोलत होते. शाळेत गेल्यावर गृहपाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आपलाच हात वर होत असे. पण मला अभ्यासाची गोडी नव्हती असा त्याचा अर्थ नाही. पहाटे उठून मोंढ्यातून भाजीपाला खरेदी करणे, त्यानंतर गल्लीबोळात जाऊन लोकांना विकणे अशी आपली दिनचर्या होती. त्यानंतर सकाळी अकरा वाजता शाळेत गेल्यावर होमवर्क झालेला नसायचा. वडील एसटीचे ड्रायव्हर होते. मोठे झाल्यावर मी रिक्षा ड्रायव्हर झालो अन् आता तर माझी हर्षदा नावाची मुलगी अमेरिकेत कमर्शियल पायलटचे ट्रेनिंग घेत आहे. रिक्षा ड्रायव्हरची मुलगी विमान चालवते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. काहीही करण्याची शक्ती प्राप्त झाली, पण अद्यापही जुने दिवस विसरलेलो नाही. त्यामुळे जमिनीवर पाय आहेत. तुमच्यातील अनेक जण मोठे होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. तुम्हीही मोठ्या कारमध्ये आपल्या आई-वडिलांना एक दिवस फिरवणार आहात, असे शिरसाठ म्हणाले. 


क्रिकेटचे मैदान गाजवणारा सचिन राजकारणात अपयशी 
साहित्यिक,विचारवंत राजकारणात यशस्वी होत नाहीत. त्यासाठी राजकारणाचे वेगळे डावपेच गरजेचे असतात. विविध क्षेत्रांत कितीही नाव कमावले तरी राजकारणात यशस्वी होण्याचे गमक वेगळेच आहे. सचिनचे क्रिकेटमध्ये जगात नाव आहे. त्याने बॅटद्वारे अनेक विक्रम केले. पण राजकारणात चमकदार कामगिरी करू शकेला नाही. हेमामालिनीनेही सिनेमात नाव कमावले, पण राजकारणात जम बसवता आला नाही. विचारवंतही राजकारणात येऊन यशस्वी झाल्याचे ऐकिवात नसल्याचे आमदार शिरसाट म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...