आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNC Aurangabad News 16 Road Will Built Up, Divya Marathi

मनपातर्फे 16 रस्त्यांचे काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील रस्त्यांच्या कामांसंबंधी मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माहिती सादर करण्यात आली. त्याप्रमाणे रस्ते पूर्ण करण्यासाठी सहा महिने ते एक वर्षापर्यंतचा कालावधी मनपा व सा.बां. विभागामार्फत देण्यात आला. मनपाने 16, तर सा.बां. विभागाने 8 रस्त्यांच्या कामासंबंधीची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील 1,388 झाडांना होणारी बाधा यासंबंधी मार्गदर्शन घेऊन माहिती सादर करण्याचे सहायक सरकारी वकिलांनी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. एम. बदर यांच्यासमोर निवेदन केले. शहरातील खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी अँड. रूपेश अनिल जैस्वाल यांनी पार्टी इन पर्सन जनहित याचिका दाखल केली. कामाची स्थिती खंडपीठास अवगत करण्यासाठी मनपातर्फे मध्यवर्ती जकात नाका ते स्टेट बँक ऑफ इंडिया चौक सिडको व सावरकर चौक सर्मथनगर ते सतीश मोटार्स, अदालत रोड आदींच्या सुरू असलेल्या कामांची छायाचित्रे सादर करण्यात आली.
जड वाहनांसाठी अधिसूचना
मालवाहतूक करण्यासाठी व जड वाहनांसाठी वाहतूक अधिसूचना आजही अस्तित्वात असल्याचे मनपाच्या वतीने अँड. राजेंद्र देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले. तत्कालीन पोलिस आयुक्त उद्धव कांबळे यांनी 16 ऑक्टोबर 2005 रोजी बॉम्बे पोलिस अँक्ट सेक्शन 131 नुसार वाहतूक अधिसूचना जारी केली होती. सकाळी 7 ते दुपारी 1 व दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत जड वाहतुकीस शहरातून बंदी घालण्यात आली आहे. हा नियम आजही कायम असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दरम्यान, औरंगपुरा-सर्मथनगर-सावरकर चौक या रस्त्याची निविदा 4 मार्च 2014 रोजी अंतिम करण्यात आली असून, 1 कोटी 26 लाख 61 हजार रुपये इतकी रक्कम दोन टक्के कमी दरासह रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी अंतिम करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या रस्त्यांचा आहे समोवेश
0 मध्यवर्ती जकात नाका ते एसबीआय चौक
0 क्रांती चौक ते पैठण गेट
0 एसएससी बोर्ड ते पीरबाजार
0 उद्धवराव पाटील चौक ते सिद्धार्थनगर चौक
0 पोलिस मेस ते बळीराम पाटील ते जळगाव रस्ता
0 हॉटेल लेमन ट्री ते हसरूल टी पॉइंट अंतर्गत रस्ता
0 जवाहरनगर ते मल्हार चौक
0 तिरुमला मंगल कार्यालय ते विजयनगर चौक
0 सावरकर चौक सर्मथनगर ते सतीश पेट्रोलपंप-कोकणवाडी चौक
0 हॉटेल अँव्हान ते मुकुंदवाडी
0 भाई उद्धवराव चौक ते सिद्धार्थनगर ते टीव्ही सेंटर
0 सावरकर चौक ते कोकणवाडी अंशत:
0 लिटल फ्लॉवर ते भावसिंगपुरा गाव
0 महापालिकेच्या वतीने 4 मार्च 2014 रोजी 12 कोटी 90 लाख 28 हजार 902 रकमेच्या कामांची आठ महिने कालावधीची निविदा जे. पी. इंटरप्राइजेसला अंतिम करण्यात आली. त्यातील रस्ते
0 आनंद गाडे चौक- भाजीवाली बाई चौक ते रमानगर
0 नाईक कॉम्प्लेक्स ते एन 4 सेक्टर