आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंद्याचा भंडाफोड: मनसे शहराध्यक्ष खांबेकर, आगा खानसह पाच अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- नगर-औरंगाबाद महामार्गावर खाम नदीलगत असणाऱ्या वाहनतळात टाकाऊ आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडणाऱ्या व्हाइट कॉलर टोळीचा वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी पहाटे पर्दाफाश केला. या कारवाईत नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक आगा खान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, मनविसेचे मराठवाडा उपाध्यक्ष तुषार पाखरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सात टँकर जप्त केले आहेत. या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिस निरीक्षक इंदलसिंह बहुरे यांनी वर्तवली आहे. सदरील रसायनमिश्रित पाण्यामुळे जमीन नापीक बनते, तर ते सजीवांच्या पोटात गेल्यास जीवित हानीची मोठी शक्यता असते, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोळे यांनी सांगितले.
‘व्हाइटकॉलरवाल्यांचा ब्लॅक धंदा’
कारखान्यांतूनबाहेर पडणारे रसायनमिश्रित पाणी टँकरमध्ये भरून ते नगरसेवक आगा खान िमया खान (३६, रा. कैलासनगर) यांच्या मालकीच्या ‘गुजरात फ्राइट कॅरिअर ट्रान्सपोर्ट’ तिसगाव शिवार गट नंबर १२४ येथील ट्रान्सपोर्टच्या जागेवर नेले जात हाेते. टान्सपोर्टच्या आवारात नदीपात्रालगत उभारलेल्या २० ते २५ फूट उंच १५० फूट रुंद भिंतीला ट्रान्सपोर्टच्या आतील भागातून जमिनीपासून किमान फूट उंचीवर ते ठिकाणी छिद्रे पाडून त्यातून टँकरमधील पाणी नदीपात्रात सोडले जात होते. तसेच अंडरग्राउंड पाइपद्वारे ते ड्रेनेजलाइनमध्ये सोडले जात होते.
असा मारला छापा : पोलिसनिरीक्षक इंदलसिंग बहुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत या गोरखधंद्याबाबत माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, रेशमा सौदागर, पोलिस हेडकाॅन्स्टेबल रमेश सांगळे, बाळासाहेब आंधळे, अनिल कदम, संदीप बिडकर, संजय रोकडे, भगवान जगताप, अनिल तुपे आदींनी घटनास्थळावर शनिवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास छापा मारला. या वेळी घटनास्थळावर एमएच ०५ एएम ७७९९ या टँकरमधील केमिकल नदीपात्रात सोडले जात असताना आढळून आले. त्याठिकाणी आणखी टँकर आढळून आले. त्यातील टँकर पोलिस येण्यापूर्वीच नदीपात्रात रिकामे करण्यात आले होते. उर्वरित टँकर भरलेले होते. या टँकरची क्षमता १२ ते १५ हजार लिटर इतकी आहे. यात एमएच ०४ बीजी ३३१२, एमएच ०४ बीजी १२१, एमएच ०४ बीजी ७२८३, एमएच ०५ एएम ८३९, एमएच १८ एम ८८०९, जीजे १६ डब्लू ८८४८ या क्रमांकाच्या टँकरचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व टँकर ताब्यात घेतले. घटनास्थळावरून आगा खान मिया खान (३६ रा.कैलासनगर औरंगाबाद), सुमीत श्याम खांबेकर (३३ रा. दलालवाडी, औरंगपुरा), चंदन नागेंद्र सिंग (२३) रा.शिवरीडीह गटिया, ता. मोमंदाबाद, उत्तर प्रदेश), तुषार तुकाराम पाखरे (२८ रा. गीतानगर, हडको, औरंगाबाद), असलम कलीम शेख (३२ रा.पाथ्रीकरनगर, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली.
कायआहे केमिकलयुक्त पाणी नष्ट करण्याची पद्धत : कंपन्यांमधूननिघणारे रसायनमिश्रित पाण्यावर प्रथम कंपनीतच उभारण्यात आलेल्या एटीपी म्हणजे प्राथमिक सांडपाणी प्रक्रिया प्लँटमध्ये प्रक्रिया करून ते नंतर मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात पाठवणे गरजेचे असते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील डी सेक्टरमध्ये असा प्लँट आहे. तेथे या रसायनमिश्रित पाण्यावर प्रक्रिया करून ते नाल्यात सोडले जाते. हे सांडपाणी सौम्य असल्याने दुष्परिणाम होत नाहीत.

त्वचा, श्वसनाचा विकार
रसायनमिश्रित पाण्यामुळे मानवी आरोग्याबरोबरच जलचरांच्या जीविताला धोका होऊ शकतो. रसायनाचे पाण्यातील प्रमाण जास्त असल्यास जनावरे दगावू शकतात. शिवाय ही रसायने हवेत मिसळल्यास मनुष्याला श्वसनाचा त्रास, त्वचारोग होतो. प्रा.सुरेश गायकवाड, रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेबआंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
हायड्रो क्लोराइडने जीव जाऊ शकतो
पाण्याच्या माध्यमातून सल्फ्युरिक अॅसिड किंवा हायड्रो क्लोराइड पोटात गेल्यास जीव जाऊ शकतो. त्याचबरोबर इतरही गंभीर आजारांची शक्यता असते. प्रा.राम माने, निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक
गोरखधंद्याचे मुंबई कनेक्शन
मुंबईतीलएका व्यापाऱ्याने दोन कंपन्यांमधील विषारी रसायन नष्ट करण्याचे कंत्राट घेतले होते. या व्यापाऱ्याशी हातमिळवणी करत खांबेकरने उपकंत्राट घेतले होते. एका टँकरमागे खांबेकरला २० ते २५ हजार रुपये दिले जात होते. याशिवाय टोलनाका, डिझेल खर्च, जकात आणि डम्पिंगचा खर्च दिला जात होता. मात्र हा खर्च वाचवण्यासाठी खांबेकर आणि त्याचे साथीदार खाम नदीतच रसायनमिश्रित पाणी सोडत होते. यात मुंबईच्या व्यापाऱ्यासह गुजरातमधील एका व्यापाऱ्याचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
नमुने प्रयोगशाळेत पाठवणार
घटनेचीमाहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोळे यांनी टँकरमधील केमिकलचे नमुने घेतले. तीन वेगवेगळ्या नमुन्यातील नमुने पोलिसांकडे, तर एक नमुना स्वत:कडे ठेवून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक तपासणीत या पाण्यात सल्फ्युरिक अॅसिड आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड आढळून आले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल साधारण दिवसांनंतर मिळणार आहे.
नंबर प्लेटवर खाडाखोड
गुजरातपासिंगचे टँकर जीजे १६ डब्ल्यू ८८४८ वर खाडाखोड करून एचजी ८८४८ असा क्रमांक टाकलेला दिसत आहे. त्यामुळे सदरील टँकर दुसऱ्या राज्यातील आहे की त्यावर बनावट क्रमांक टाकला आहे, हे आरटीओ कार्यालयातून मागवलेली माहिती मिळाल्यानंतरच कळेल. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात येणार असल्याचे बहुरे यांनी सांगितले.