आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'MNS Demonstrations Against SBOA The Growth Of The Charge,

एसबीओए’च्या शुल्कवाढीविरुद्ध मनविसेची निदर्शने, रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-एसबीओए शाळेच्या शैक्षणिक शुल्कवाढीविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवा सेनेनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हर्सूल, एन-11, जाधववाडी परिसरातील मध्यमवर्गीय नागरिकांची पाल्ये या शाळेत अधिक संख्येने आहेत. त्यांना विश्वासात न घेताच शाळेने गेल्या महिन्यात शैक्षणिक शुल्क 850 वरून जवळपास दुप्पट म्हणजे 1500 रुपये केले. यामुळे हादरलेल्या पालकांनी एसबीओए व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापकांची भेट घेऊन शुल्क कमी करण्याची मागणी केली. स्वाक्षरी मोहीम राववून निवेदनही देण्यात आले. त्यावर विचार झाला नाही. हा प्रकार काही पालकांनी मनविसे पदाधिकार्‍यांच्या कानावर घातला. त्याची दखल घेऊन त्यांनी नगरसेवक राज वानखेडे, शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या नेतृत्वात दुपारी 12 वाजता निदर्शने, रास्ता रोको केला. आंदोलनात मनविसेचे मराठवाडा अध्यक्ष संजोग बडवे, जिल्हाध्यक्ष विशाल आहेर, अमोल खडसे, अरुण औताडे, तुषार पाखरे, ललित देशपांडे, सचिन जिरे, चंदन कुलकर्णी, राहुल सोनवणे, गणेश सोळुंके, सचिन सोनवणे, हनुमान शिंदे, तुषार नरवडे, राहुल तायडे, अविनाश पोफळे, रूपेश सूर्यवंशी आदींचा सहभाग होता. शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, युवा सेनेचे मिथुन व्यास, नारायण सुरे, नगरसेविका सविता सुरे, किशोर नागरे आदींनीही मुख्याध्यापक सुरेखा माने यांना निवेदन देऊन फीवाढ मागे घेण्याची मागणी केली. या वेळी नितेश वहाटुळे, सागर खरगे, अमोल मते, नीलेश शिंदे, नितीन जाधव आदींची उपस्थिती होती.

29 जानेवारीला बैठक

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने याच प्रकरणात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले. औताडे यांनी एसबीओएचे सचिव शिंदे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा 29 जानेवारीला पालकांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता शिंदे म्हणाले की, आमची शाळा खासगी आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कावरच शाळेचा कारभार चालतो. गेल्या दोन वर्षांत फीवाढ केली नव्हती. त्यामुळे आता ती केली आहे.