आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Deputy State President Baba Ugale Comment On Raj Thackeray At Jalna.

गोरखधंदा लपवण्यासाठी राज ठाकरेंनी उघडला पक्ष; मनसेच्या प्रदेश उपाध्यक्ष उगलेंचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज ठाकरे यांनी स्वत:चे गोरखधंदे लपवण्यासाठी राजकीय पक्ष उघडला असल्याचा घणाघाती आरोप मनसेच उपाध्यक्ष बाबा उगले यांनी गुरुवारी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आर्थिक \'सेटलमेंट\' झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतली. एवढेच नाही तर टोल वसूलीत टक्केवारी ठरवून राज ठाकरे यांनी आंदोलन गुंडाळल्याचे बाबा उगले यांनी म्हटले आहे. 
 
बाबा उगले यांनी गुरुवारी जालन्यात मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर उगले यांनी  आपल्या नवीन पक्षाची घोषणाही केली. \'मराठवाडा मुक्ती मोर्चा\' या नावाने उगले पक्ष सुरु करणार आहेत. यावेळी उगले यांनी राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे वृत्त एका खासगी मराठी वृत्तवाहिणीने प्रसिद्ध केले आहे.
 
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मनसेमध्ये राहून आपले मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच आपली मानसिक पिळवणूक झाली आहे. राज ठाकरे यांनी आपल्याला भरपाई म्हणून पाच कोटी रुपये द्यावी, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा उगले यांनी दिला आहे. मनसेची राजकीय पक्षाची मान्यता रद्द करावी, यामागणीची याचिका कोर्टात दाखल करणार असल्याचेही उगले यांनी म्हटले आहे.
 
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, राज ठाकरे करतात कार्यकर्त्यांवर मनमानी...