आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Interview For Upcoming Election In Aurangabad City

मनसेच्या मुलाखतींचे सोपस्कार पार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सागर लॉन येथे मुलाखती घेतल्या. ४६ मतदारसंघांसाठी १७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सकाळी ११ वाजेपासून मुलाखती सुरू झाल्या. अनेक हौशा-नवशांनी गर्दी केल्यामुळे मुलाखत प्रक्रियेत गांभीर्य दिसले नाही. शिवाय राज ठाकरेही मुलाखतींसाठी पूर्णवेळ थांबू शकले नाहीत. त्यामुळे या मुलाखती केवळ सोपस्कार ठरल्याचे जाणवले. मात्र, या निमित्ताने इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाची संधी सोडली नाही.

मुलाखतींना राज ठाकरे यांनी स्वत: सुरुवात केली. सोबत आमदार बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, प्रवीण दरेकर, शिरीष सावंत उपस्थित होते. हे पॅनल प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून उमेदवारी निश्चित करील असे वाटले होते. मात्र, सभागृहातच इच्छुकांना उभे करून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे ही केवळ चाचपणी असल्याचे जाणवले. लातूर, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांनंतर दुपारी तीनच्या सुमारास औरंगाबादेतील मतदारसंघांची वेळ आली तेव्हा आपली तब्येत बरी नसल्याचे सांगून राज ठाकरे आरामासाठी निघून गेले. त्यानंतर मात्र उमेदवारांचा उत्साह कमी झाला.
औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील इच्छुकांच्या मुलाखती पक्षातील इतर श्रेष्ठींनी घेतल्या. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुलाखतीची सर्व प्रक्रिया आटोपली गेली. पुढील चार दिवसांत यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातील सगळ्या मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांना बोलावून आपण ४६ जागा लढवणार असल्याचे संकेत मनसेने दिले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी पक्षाला सक्षम उमेदवार मिळणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिला जाणार नाही, असा मतप्रवाह आहे. शहरातील केवळ मध्य मतदारसंघच मनसेकडून लढवण्यात येईल, अशीही चर्चा या वेळी सुरू होती.

यांनी दिल्या मुलाखती
- पश्चिम मतदारसंघातून गौतम आमराव, अरविंद धीवर, गजानन नांदूरकर, पूर्वसाठी संतोष पवार, सुमीत खांबेकर, डॉ. शिवाजी कान्हेरे, आशिष सुरडकर.
- मध्यकरिता राज वानखेडे, गणेश वानखेडे, मंगला ठोंबरे, मंगला राजपूत, सिल्लोडसाठी दीपाली काळे, किसनराव काळे, कमलेश कटारिया,
- गंगापूर : दिलीप बनकर, बादशहा पटेल, शैलेश क्षीरसागर, वैजापूर : प्रशांत सदाफळे, जे. के जाधव, कन्नडकरिता सुभाष पाटील, नितीन खंडागळे, सर्जेराव काळे, रेखा पारे, मनीषा कुलकर्णी, पैठणसाठी डॉ. सुनील शिंदे, विजयसिंह बोडखे पाटील.