आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या अस्मानी संकटाविरुद्ध लढण्याची गरज असल्याची भूमिका मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मांडली. नांदगावकर यांनी मनसेच्या सहकार सेनेचे अध्यक्ष शिवाजी नलावडे आणि संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्यासह गुरुवारी (24 जानेवारी) ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी मांडलेली मते त्यांच्याच शब्दांत...
म राठवाड्यात दुष्काळामुळे भीषण परिस्थिती आहे. जनता पाणी-पाणी करत असताना सत्ताधार्यांचे मात्र त्याकडे लक्ष नाही. पण ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नाही. या प्रश्नी सर्व पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जाता येईल हे ठरवणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षांबरोबर चर्चा करावी. मनसेकडून त्यांना याविषयी नेहमी सहकार्य असेल.
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांत दुष्काळाने जनता त्रस्त झाली आहे. टँकरची व्यवस्था झाली तरी भूगर्भातच पाणी नाही. मग पाणी पुरवणार कुठून? यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. अशा वेळी राज्यातल्या जलतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन मार्ग सुचवायला हवा. पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांमधून पाणी मिळणे शक्य आहे. मात्र त्यावरूनही राजकारण पेटले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीच त्यासाठी सहकार्य करायला तयार नाहीत. जनावरांच्या चारा छावण्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सिंचन घोटाळ्यामुळे कामे फक्त कागदावरच झाली. त्यामुळे राजकारण्यांच्या पापांचे प्रायश्चित्त जनतेला घ्यावे लागत आहे.
शहरात कामाची गरज : जिल्ह्यात मनसेचे काम चांगले सुरू आहे. पण शहरात आणखी काम करावे लागणार आहे. घराघरात पोहोचावे लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पक्षाकडे सत्ता आहे, त्यांनी शहराचा काहीच विकास केला नाही. जिल्ह्यातही तीच बोंब आहे.
राज्य बँकेचे दिवाळे : शिवाजी नलावडे यांनी राज्याच्या सहकार क्षेत्राच्या बिकट अवस्थेवर चिंता व्यक्त केली. शेतकर्यांच्या नावावर पुढार्यांनी भलेमोठे कारखाने उभारले. मात्र एवढी वर्षे झाली तरी त्यांना काहीच मिळाले नाही. राज्य बँकेचेही राज्यकर्त्यांनी अक्षरश: दिवाळे काढले आहे. जनतेने उघड्या डोळ्यांनी या गोष्टीकडे पाहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.