आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे कंपनीत घुसून तोडफोड; 12 लाख रुपये हिसकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- एमआयडीसी वाळूजमधील आर्बिट इलेक्ट्रॉनिक इंडिया प्रा. लि. कंपनीत तोडफोड क रून कामगारांना मारहाण तसेच कामगारांचे वेतनाचे सुमारे 12 लाख 80 हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या मारहाणीत एक अपंग कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, तालुका सचिव वसंत प्रधान यांच्यासह सुमारे 30 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील कासोडा शिवारात आर्बिट इलेक्ट्रॉनिक इंडिया प्रा.लि.ही कंपनी आहे. या कंपनीत विजेचे एमसीबी व कंट्रोल पॅनलच्या सुट्या भागांची जोडणी केली जाते. कंपनीत बुधवारी नियमित कामकाज सुरू असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास इनोव्हा (एमएच 20सीएच 1222), फॉच्यरुनर (एमएच 20 सीडी 9990), स्कॉर्पिओ (एमएच 20सीएस 7545) या चारचाकी वाहनांसह दुचाकीवर 30 ते 35 जण कंपनीत शिरले. त्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, गंगापूर तालुका सचिव वसंत प्रधान, अमोल थोरात, कृष्णा पाटील, दत्ता वाघचौरे यांच्यासह इतरांचा समावेश होता. त्यांनी कंपनीत शिरून कामगारांना मारहाण करत व्यवस्थापकांची के बिन व इतर भागांत लावलेल्या काचा फ ोडून टाकल्या. कंपनीत लावलेला एक सीसीटीव्ही कॅमेराही त्यांच्या तोडफोडीतून सुटू शकला नाही. एवढय़ावरच न थांबता त्यांनी कच्चा माल व र्जमनी बनावटीच्या यंत्रांचेही नुकसान केले. तसेच कंपनी व्यवस्थापकाने कामगारांचे वेतन देण्यासाठी आणलेले सुमारे 12 लाख 80 हजार रुपये लुटून सर्व जण पसार झाले.
हल्लेखोरांच्या मारहाणीत रवींद्र बावस्कर हा अपंग कामगार जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी सुमारे 12 लाख 80 हजार रुपये लुटल्याचे तसेच तोडफोडीत 10 लाख रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार कंपनी व्यवस्थापक दादा प्रल्हाद घोंगडे यांनी पोलिसांत दिली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी नुकसानीसह दरोडा टाकल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे स्वत: तपास करत आहेत.