मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी शहरात येणार असल्याने स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून ते उच्च न्यायालयापर्यंत जालना रोडवर सर्वत्र पोस्टर लावले आहेत. आचारसंहिता लागू झाली असताना कुठलीही परवानगी न घेता ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करू, असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुन्हे दाखल करणार
आचारसंहिता लागलेली असताना पोस्टर लावणे चुकीचे आहे. मी अधिकाऱ्यांना तत्काळ हे राजकीय पक्षाचे अनधिकृत पोस्टर काढायला लावले आहेत. या शिवाय आचारसंहिता कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करायला लावले आहेत.प्रकाश महाजन, मनपा आयुक्त
चौकशी करतो
शहरात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही पोस्टर वा बॅनर परवानगीशिवाय लावता येत नाही. मनसेने असे पोस्टर लावले असतील तर ते नियमाविरुद्ध आहे. मी तत्काळ अधिकाऱ्यांना पाठवतो व हे नेमके काय प्रकरण काय आहे याची चौकशी करतो.विक्रमकुमार, जिल्हाधिकारी