आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - वाढते अत्याचार रोखण्यासाठी स्त्रियांनी सक्षम होणे गरजेचे आहे. या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रविवारी दुपारी कॅनॉट परिसरात महाविद्यालयीन तरुणींना दंडुके वाटप करण्यात आले.
देशात लोकशाही रुजून 64 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही स्त्रिया सुरक्षित नाहीत. त्यामुळे तरुणींमध्ये आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने मनविसेकडून दंडुके वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी न झाल्यास मनविसेकडून आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती मनविसेचे उपाध्यक्ष संकेत शेटे आणि राहुल पाटील यांनी दिली. यावेळी प्रा.विवेक दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश शहाणे, गणेश ढगे, योगेश खाडे, सतीश सोनवणे, योगेश घोडके यांनी सहकार्य केले.
दंडेलशाहीला प्रोत्साहन देऊ नये
मुलींना दंडुके वाटून दंडेलशाहीला प्रोत्साहन दिल्यापेक्षा स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. त्यासाठी पोलिस सहकार्य करेल. आमच्यापर्यंत आलेल्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. पोलिसांकडे मदत मागा.
राहुल फुला, रोडरोमिओविरोधी पथकप्रमुख
सर्वांनी पेटून उठणे गरजेचे
मुलींनी आपल्या राहणीमानात बदल करावा, असे मत राजकारण्यांनी आणि समाजसेवकांनी व्यक्त केले, पण समाजानेच आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. -प्रतीक्षा जगत
वर्षानुवर्षांपासून समाजाने स्त्रियांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. सध्या मुली मुलांच्या बरोबरीने काम करीत आहेत. यापुढे मुली अत्याचार सहन करणार नाहीत. - माधुरी मुळे
समाजाच्या एखाद्या वर्गावर अन्याय होत असेल तर त्यांनी पेटून उठणे आवश्यक आहे. सगळ्या तरुणींनी सक्षम होऊन अत्याचाराला विरोध करणे आवश्यक आहे. स्वरदा अन्सरवाडकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.