आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी फिरती विज्ञान प्रयोगशाळा शहरात येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सुमारे पन्नास लाख रुपयांत खरेदी केलेली फिरती विज्ञान प्रयोगशाळा अद्यापही औरंगाबादेत आणलेली नाही. विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिरत्या प्रयोगशाळेची व्हॅन कोलकात्यातून निघाली असून १४ किंवा १५ ऑगस्टला शहरात दाखल होईल.
निवृत्त कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात फिरती प्रयोगशाळा खरेदी करण्यात आली. कोलकाता येथून ही व्हॅन आणण्यासाठी तज्ज्ञ वाहनचालक विद्यापीठात उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत मागील दोन वर्षांपासून मोबाइल व्हॅन आणली जात नव्हती; परंतु विद्यापीठातील वाहनचालक अनिकेत वारेकर मंगळवारी व्हॅन घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत.

डॉ. पांढरीपांडे यांनी वर्धापन दिनानिमित्त सुरू केलेल्या दोनदिवसीय ओपन डेमध्ये भाडेतत्त्वावर सायन्स व्हॅन आणली होती. त्यानंतर त्यांनी ‘सायन्स व्हॅन’विद्यापीठातर्फेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांपूर्वी सुमारे पन्नास लाख रुपये देऊन मोबाइल सायन्स व्हॅन खरेदी केली. विद्यापीठाचा वर्धापन दिन अवघ्या दहा दिवसांवर आलेला असतानाही व्हॅन येते की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. ‘सायन्स व्हॅन’ विद्यापीठातर्फेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांपूर्वी सुमारे पन्नास लाख रुपये देऊन मोबाइल सायन्स व्हॅन खरेदी केली.
कोलकात्याहून येणार व्हॅन
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत (१६ मार्च) सदस्य भाऊसाहेब राजळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना कुलगुरूंनी, ओपन डेपूर्वी व्हॅन कोलकात्यातून आणण्याचा निश्चय बोलून दाखवला होता. त्या वेळी कुलगुरूंनी व्हॅन आणण्यासाठी विशेष निधीची तरतूदही अर्थसंकल्पात केली होती. त्याशिवाय दोनदिवसीय ओपन डे दरम्यान या प्रयोगशाळेची माहिती देण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती.