आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातून रोज दहा मोबाइलची चोरी, नागरिकांना लाखाेंचा गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जब्या भाेसलेकडून जप्त केलेले मोबाइल. - Divya Marathi
जब्या भाेसलेकडून जप्त केलेले मोबाइल.
औरंगाबाद- शहरातील विविध भागांतून दररोज किमान दहा मोबाइल चोरी होत अाहेत. या माध्यमातून नागरिकांना एक लाखाचा गंडा घालण्यात येत आहे. शहर पोलिस ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत असून ग्रामीण पोलिसांनी मात्र मोबाइल चोराला पकडून त्याच्याकडून आठ महागडे मोबाइल जप्त केले. कर्णपुरा आणि रविवारच्या बाजारातून १८ ऑक्टोबर रोजी दहापेक्षा अधिक मोबाइल चोरील गेले. मागील सहा महिन्यांपासून रविवारच्या बाजारात महिलांचे मोबाइल चोरीला गेल्याच्या अनेक घटना पोलिस ठाण्यात नोंदवल्या गेल्या. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत.
पैठण बसस्थानकाजवळ एक जण चोरीचे मोबाइल विकण्यासाठी आला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. जब्या ऊर्फ उमेश मारक्या भोसले (२०, रा. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जब्या हा घरफोड्यादेखील करतो. त्याच्या ताब्यातून ३० हजार ५०० रुपयांचे मोबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, दिलीप मगरे, अनिल गायकवाड, राजेश चव्हाण, भूषण देसाई यांच्या पथकाने केली. तसेच अन्य तीन जणांचे हजाराे रुपयांचे मोबाइल चोरीला गेले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, रविवारी शहरातून चोरी गेलेले मोबाइल त्यांची किंमत आणि ठिकाण...