आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile,Modem, Wi Fi Use When You Need Actress Juhi

मोबाइल, वायफाय याचा वापर जपून करा, शक्य झाल्यास टाळाच - जुहीचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोबाइल,मोडेम, वायफाय याचा वापर जपून करा, शक्य झाल्यास टाळाच. ही उपकरणे आरोग्यासाठी घातक आहेत. मी कटाक्षाने यांचा वापर टाळते. खूप आवश्यक तेव्हाच वापरते, तुम्हीही लक्ष द्या, असा सल्ला अभिनेत्री जुही चावलाने दिला. गेल्या ४-५ वर्षांपासून जुही वायरलेस रेडिएशनपासून होणाऱ्या धोक्याबाबत जनजागरण करत आहे. 'चॉक अँड डस्टर' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती बुधवारी शहरात आली होती. या वेळी 'दिव्य मराठी'ने साधलेला संवाद तिच्या शब्दांत.

मोबाइलचा वापरामुळे माझी प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात आले. मग मी अभ्यास केला. वायरलेस गॅजेटमधून निघणाऱ्या किरणांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बैचेनी, कान दुखणे, मनोविकार यांसारखे त्रास सुरू होतात. हे टाळण्यासाठी मोबाइलचा जपून वापर करा. मी मोबाइलचा वापर जवळपास बंदच केलाय. तुम्हीही करून बघा. आठवड्यात एकदाच फास्ट फूड खा, असा सल्लाही तिने दिले. चांगल्या शिक्षणाच्या आपण गप्पा करतो; पण शाळांमध्ये गळतीचे प्रमाण गंभीर आहे. याचे मुख्य कारण शाळांत शौचालये नसणे हे आहे. केवळ इमारती बांधून चालणार नाही, तर तेथे आवश्यक सुविधा द्यायला हव्यात. आपल्या संस्कृतीत तर गुरूला देव मानले आहे. शास्त्रातही शिक्षकाचे स्थान अधाेरेखित करण्यात आले आहे. पूर्वी शिक्षकांबाबत आदर असायचा. आता तो कमी झाला. एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या रूपात राष्ट्र घडवतो. त्याचा सन्मान करायलाच हवा.

रिव्ह्यू वाचून दिलवाले पाहणे टाळला
अहमदाबादेतअसताना दिलवाले प्रदर्शित झाला, कुटुंबीयांना चित्रपट आवडला नाही. तसेच रिव्ह्यू वाचून मी दिलवाले बघणे टाळले. एखादा चित्रपट चांगला, तर एखादा वाईट होऊ शकतो. दिलवाले सोडून मी बाजीराव मस्तानी बघितला असल्याचे जुहीने सांगितले.

औरंगाबाद शहर बेस्ट
'चॉक अँड डस्टर'चे ऑगस्ट महिन्यात एक दिवस औरंगाबादेतील दोन शाळांत शूटिंग झाले होते. मुलांनी खूप चांगला सपोर्ट केला. कोणीही याची बाहेर वाच्यता केली नव्हती. मुले खूप गोड होती. त्यातून औरंगाबादही बेस्ट असल्याचे जाणवले. प्रेक्षकांच्या शुभेच्छा आणि प्रेम हेच माझ्या सौंदर्याचे रहस्य आहे.