आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना तलवार भेट; केंद्राला आैरंगाबाद खंडपीठाची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात नगर जिल्ह्यातील राहुरीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनापरवाना तलवार भेट देऊन शस्त्रास्त्र कायदा आणि आचारसंहितेचे जाहीर उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी कोपरगावचे संजय काळे आणि संदीप कुलकर्णी यांच्या याचिकेवर हे आदेश दिले.

राहुरीमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांना तलवार भेट देण्यात आली होती. मोदींना झेड प्लस सुरक्षा असताना तलवार देऊन शस्त्रास्त्र कायदा तसेच आचारसंहितेचे भरसभेत उल्लंघन झाल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने राज्यस्तरावर विचारणा केली असता कारवाई प्रलंबित असल्याचे सांिगतले. त्यानंतर तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली. याचिकेत पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या गृह विभागासह जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकर्त्यांतर्फे अॅड. सतीश तळेकर, अॅड. अजिंक्य काळे, तर सरकारपक्षातर्फे गिरीश ठिगळे यांनी काम पाहिले.
विनापरवानाच तलवार भेट
राहुरीत मोदींना भेट दिलेली तलवार कोणी व कोठून आणली, याची परवानगी घेतली होती का, याची माहिती याचिकाकर्त्यांनी राहुरी पोलिसांकडे आरटीआयअंतर्गत मागितली होती; परंतु यासंबंधी परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...