आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेचा विनयभंग शिक्षकाला बदडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सहकारी शिक्षिकेला घरी जाऊन छेडणाऱ्या मास्तरला नातेवाइकांनी शाळेत जाऊन चोप दिला. हडको एन-९ येथील एका शाळेत सकाळी हा प्रकार घडला. वेदांतनगर ठाण्यात शिक्षकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत नामदेव जाधव (४०, रा. देवळाई चौक) असे या शिक्षकाचे नाव आहे.
जाधव विवाहित असून त्यांना मुलेही आहेत. पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, एक डिसेंबर रोजी हा शिक्षक घरी आला या वेळी घरात कोणीच नसल्याचे पाहून त्याने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले. संतापलेल्या शिक्षिकेने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर शिक्षकाविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेनंतर मास्तरने काही दिवस शाळेला दांडी मारली. मात्र, शुक्रवारी तो शाळेत आल्याचे शिक्षिकेच्या नातेवाइकांना कळाले. संतप्त नातेवाइकांनी त्याला शाळेत येऊन मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना नेमका प्रकार कळला नाही. शिक्षिकेनेच आेरडून त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. या घटनेची गंभीर दखल घेत दोषी शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे व्यवस्थापनाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...