आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा परिसरात विद्यार्थिनीचा विनयभंग, शहरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार अद्यापही सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मधल्या सुटीत शाळेच्या परिसरात उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरी चॉकलेट देत विनयभंग केल्याचा प्रकार जानेवारी रोजी सकाळी १० वाजता छावणीत घडला. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश रमेश नाडे (अमीन चौक, ख्रिस्तीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
 
छावणी परिसरातील एका शाळेत मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही दिवसांपासून आकाश तिच्या शाळेच्या बाहेर येऊन उभा राहत होता. सतत पाठलाग करतो, जानेवारीला आकाशने तिचा हात धरत बळजबरीने चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला.चॉकलेट घेण्यास नकार देत हाताला झटका मारला. परंतु त्याने अश्लील बोलून अपमानित केले.
मुलीने हा प्रकार आईला सांगितला. आईने आकाशला जाब विचारला. परंतु त्याने तिच्या आईलासुद्धा शिवीगाळ केली. याप्रकरणी छावणी ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक बी. के. धनेधर तपास करत आहेत.