आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोंढा उड्डाणपुलावर पहिला अपघात, दांपत्य गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद मोंढानाका उड्डाणपुलावर उद््घाटनाच्या आधीच पहिला अपघात झाला. या पुलावरून धावणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दांपत्य गंभीर जखमी झाले. बिपिन पांडे (४०) आणि प्रिया पांडे (३५, रा. आकाशवाणी) अशी जखमींची नावे असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पांडे दांपत्य सायंकाळी दुचाकीने पुलावरून घराकडे जात असताना कारने (एमएच २० बीएन ३५१२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे पांडे दांपत्य जखमी झाले. अपघाताच्या वेळी पुलावरील सर्व पथदिवे बंद होते. अपघातानंतर पुलावर वाहतूक खोळंबली. मात्र, वेळीच वाहतूक शाखा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. चार दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा पूल सुरू केला होता. मात्र, पूल सुरू केल्यानंतर बांधकाम विभागाने तो पुन्हा बंद केला होता. मात्र, आषाढी एकादशीच्या वारकऱ्यांनी पूल सुरू केला होता.

दुचाकीला धडक देणारी कार.