आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोंढा व्यापाऱ्यांना दिवाळीपर्यंत दिलासा, नोव्हेंबरला अंतिम निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळी सण असल्यामुळे या दिवसांत व्यापाऱ्यांचे स्थलांतर करू नका, अशी मागणी आमदार अतुल सावे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली. शुक्रवारी सावेंसह व्यापाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले. या प्रकरणावर नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे चार दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मोंढ्यातील पाहणी करून व्यापाऱ्यांना आठ दिवसांत जाधववाडीत स्थलांतरित होण्याचे आदेश दिले होते. तसेच दुसऱ्या दिवशी वाहन जप्तीची कारवाई सुरू केली हाेती.

पोलिस आणि व्यापाऱ्यांमध्ये वादावादी होऊन तणाव निर्माण झाला होता. दिवाळीपर्यंत जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांना स्थलांतरित करू नये, मोंढ्यात ट्रकला येण्याची परवानगी द्यावी, अशी अाग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी दिवाळीपर्यंत व्यापाऱ्यांना दिलासा दिला; पण नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठकीला व्यापारी महासंघ, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, किराणा असोसिएशनचे पदाधिकारी, मार्केट कमिटीचे व्यापारी संघाचे संचालक, नगरसेवक प्रशांत देसरडा, अनिल मकरिये यांची उपस्थिती होती

रात्री माल उतरवणार
मार्केटकमिटीकडून दिशाभूल केली जात आहे. २००६ मध्ये उच्च न्यायालयाने नवीन मार्केटमध्ये जागा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार २००७ मध्ये व्यापाऱ्यांनी जागेसाठी मार्केट कमिटीकडे पैसे भरले आहेत. काहींना प्लॉट देण्यात आलेले नाहीत. सध्या मोंढ्यात रात्री माल उतरवण्यास परवानगी दिली, असे संजय कांकरिया यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...