आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांनी मोंढा बंदचे हत्यार उपसताच पोलिस प्रशासन नमले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहतुकीस अडथळा करणारे जुन्या मोंढ्यातील अन्नधान्याचे ट्रक आणि रिक्षा जप्त करताच व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवत बुधवारी दुपारपर्यंत आपले व्यवहार बंद ठेवताच पोलिस प्रशासनाने तूर्तास कारवाई स्थगित केली.
पोलिस आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. तणाव वाढू लागल्याने घटनास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सामंजस्य दाखवल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुपारनंतर आपले व्यवहार पूर्ववत केले. यावर तोडगा काढण्यासाठी नोव्हेंबरला बैठक ठेवण्यात आली आहे.

जुना मोंढ्यातील व्यापार नवीन जाधववाडी मार्केट यार्डमध्ये स्थलांतरित करण्यात यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने २००५ मध्येच दिले आहेत. त्याची अंमलबजावणी त्याच वेळी होणे आवश्यक होते. मात्र, राजकीय शक्तीपुढे कुणाचेच काही चालले नाही. तब्बल ११ वर्षांनंतर सोमवारी प्रथमच पोलिस प्रशासन, महापालिका आणि बाजार समितीने बैठक घेऊन कारवाईचे पाऊल उचलले होते. मंगळवारी पोलिस आयुक्तांनी या भागात फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला आणि बुधवारी सकाळी फौजफाट्यासह मोंढ्यातील दोन ट्रक ताब्यातही घेऊन काही रिक्षांवरही कारवाई केली. यामुळे व्यापारी आणि पोलिसांत वादावादी झाली. व्यापाऱ्यांची बाजू घेण्यासाठी भाजपचे नगरसेवक राजू शिंदे, बाजार समितीचे संचालक भागचंद ठोंबरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली असता तणावग्रस्त वातावरण निवळले.

कारवाई थांबवा: व्यापारी भाजपसोबत आहेत. जिन्सीतील १२ सदस्य आमच्यासोबत आहेत. यामुळे काँग्रेसचे सभापती आकसापोटी ही कारवाई करत आहेत. आजवर काहीच कारवाई झाली नाही. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर षड््यंत्र सुरू केले. जुना मोंढा स्थलांतरित करण्यापूर्वी सर्वांना जागा मिळावी. व्यापाऱ्यांनी कोटी २५ लाख समितीकडे जमा केले आहेत, असे नगरसेवक राजू शिंदे यांनी सांगितले.

आॅक्टोबर रोजी बैठक
दिवाळीनंतर ऑक्टोबर रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात व्यापारी, लोकप्रतिनिधींची बैठक होईल. बैठकीत तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली. व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता हा निर्णय घेण्यात येणार आहे. दिवाळी सणामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

अंमलबजावणीत विरोधकांचा व्यत्यय
^आकसापोटी कारवाईकरण्याचा प्रश्नच येत नाही. उलट विरोधक उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना व्यत्यय आणत आहेत. याच कारणामुळे आजवर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. -संजय औताडे, सभापती, जिकृउबास

गोडाऊनमधील मालाचा पंचनामा
^बुधवारी १० व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमधील साठ्याचा पंचनामा केला. दिवसांत उर्वरित स्टॉक पंचनामा पूर्ण केला जाईल. बाजारात माल आणण्यास बंदी घातली आहे. एकूण २० कर्मचारी यासाठी काम करत आहेत. -विजय शिरसाट, सचिव, जिकृउबास.

बातम्या आणखी आहेत...