आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोंढा नाका उड्डाणपुलाचे २५ जुलै रोजी उद््घाटन, मुख्यमंंत्री, विधानसभा अध्यक्षांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बहुचर्चित जालना रोडवरील मोंढा नाका उड्डाणपुलाचे २५ जुलै रोजी उद््घाटन होणार आहे. यासंबंधीची लेखी सूचना रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून आल्याची माहिती उपअभियंता उदय बर्डे यांनी दिली. मोंढा नाका उड्डाणपूल येत्या आठ दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने नुकतेच प्रकाशित केले. पुलाचे काम झाले, पण त्यावरील लाइटचे काम बाकी होते. त्यामुळे आठवडाभर उशीर लागला. आता उद््घाटनाच्या तारखेवर निश्चिती झाली आहे. यासंदर्भात माहिती देताना उपअभियंता बर्डे यांनी सांगितले की, पुलाचे काम करताना अनेक अडचणी आल्या, मात्र वेळेत काम पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. पुलावरील पथदिवे लावले असून त्याची टेस्टिंगही झालेली आहे. किरकोळ कामे येत्या चार दिवसांत पूर्ण होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद््घाटन सोहळा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात
अाहेत. मुख्यमंत्री येऊ न शकल्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुलाचे उद््घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...