आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैशाची बॅग पळवणारी टोळी सक्रिय, आठ दिवसांत तीन घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैशाची बॅग पळवणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. गेल्या आठ दिवसांत तीन घटना घडल्या असून आतापर्यंत सात लाख २५ हजार रुपयांची चोरी झाली आहे. पैशाची ने-आण करणाऱ्यांवर नजर ठेवणे आणि पैशांनी भरलेली बॅग हिसकावून घेऊन पळून जाणे अशी कार्यपद्धती असलेली ही टोळी बाहेर राज्यातून आली असल्याची शक्यता आहे. या तिन्ही घटना क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या अाहेत. मोंढ्यातील व्यापाऱ्याची २५ मे रोजी सव्वादोन लाखांची बॅग पळवण्यात आली.
घटना क्रमांक 1: लक्षविचलित करण्यासाठी चोरट्यांनी दुकानाच्या लॉकमध्ये फेव्हिक्विक आणि लाकडाचे तुकडे टाकले. दुकानमालक दुकान उघडण्याच्या प्रयत्नात असताना त्याची दुचाकीला लावलेली बॅग चोरटे घेऊन पसार झाले. ही घटना २५ रोजी मोंढ्यात घडली. निराला बाजार येथील श्रीकांत खटोड यांचे नवा मोंढ्यात जय ट्रेडिंग होलसेलचे किराणा दुकान आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता ते नोकरासह दुकान उघडण्यासाठी आले. त्यांनी दुकान उघडण्यासाठी चावी नोकर अनिरुद्धला देऊन ते त्यांच्या होंडा अॅक्टिव्हावर ( एमएच २० एक्स १३१६) बसले होते. चोरट्यांनी कुलपात फेव्हिक्विक आणि काड्या टाकल्या होत्या. त्यामुळे नोकराकडून कुलूप उघडत नसल्यामुळे त्याने मालकाकडे चावी दिली. खटोड यांनी कुलूप उघडण्यापूर्वी हातातील बॅग गाडीच्या हँडलला लावली. दुकानाबाहेर ग्राहकही जमल्यामुळे त्यांनी कुलूप तोडले. दरम्यान, चोरट्यांनी बॅग लांबवली. तपास सहायक फौजदार राठोड करत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घटना क्रमांक 2, घटना क्रमांक 3...
बातम्या आणखी आहेत...