आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ परिसरातील माकडे कुणाच्या मालकीची?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - खुलताबाद तालुक्यासह वेरूळ लेणी परिसरातील वन्यप्राण्यांना दुष्काळाचा फटका बसत असून याबाबत वन विभाग व पुरातत्त्व विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.


वेरूळ लेणी परिसरात माकडांची संख्या बरीच असून येथे येणाºया पर्यटकांनी दिलेल्या खाद्यपदार्थांवर ते पोट भरतात. मात्र, यंदा वाढत्या उन्हामुळे पर्यटकांच्या संख्येत झालेली घट व दुष्काळामुळे परिसरातील गायब झालेले पाणी या दोन्ही गोष्टींमुळे या प्राण्यांचे हाल होत आहेत, तर प्रशासनानेही परिसरात पाणवठे तयार केलेले नसल्याने या प्राण्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. वन विभाग नियमावर हात ठेवत लेणी प्रशासनाकडे बोट दाखवत आहे, तर लेणी प्रशासन मात्र बघू, करू अशी सरकारी उत्तरे देण्यात धन्यता मानत आहे.


हे आमचे क्षेत्र नाही
आम्ही सध्या म्हैसमाळ व चिंचोली येथे दोन, तर खुलताबाद सर्व्हे नंबर 61 मध्ये 2010 मध्ये पाणवठे बनवले आहेत. लेणी परिसरातील माकडे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या जागेत असल्याने येथे तोच विभाग पाणवठे तयार करू शकतो. लेणी प्रशासनाने मदत मागितल्यास तांत्रिक मदत करण्यात येईल. मात्र, फंडिंग त्यांनीच करावी.
जे. एन. येडलवार, वन परिक्षेत्र अधिकारी.


पाणवठे बनवण्याचा आमचा विचार असून त्याकरिता पाणवठे मागणीचा एक अर्ज तुम्ही करा. आम्ही माकडांकरिता पाणवठे तयार करू. मोहंमद सल्लाउद्दीन, वरिष्ठ संवर्धन सहायक पुरातत्त्व विभाग.