आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दडी मारलेला मान्सून येत्या 48 तासांत सक्रिय होण्याचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्ह्यात 25 ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम पाण्याच्या साठय़ावर होत आहे. 48 तासांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज खगोलशास्त्रीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यंदा जून, जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाने डोळे वटारले. जिल्ह्यात 1 ऑगस्टला 39 मिमी सर्वाधिक पाऊस झाला. गंगापूर, वैजापूर आणि पैठणमध्ये सरासरीच्या फक्त 50 टक्के पाऊस झाला. पैठणमध्ये 340 मिमी, वैजापूर 318 व गंगापूर 314 मिमी पाऊस झाला.

पंधरा दिवसांपासून दडी
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्टनंतर पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. सध्या सरासरी 32 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. तर ऑगस्टमध्ये फक्त 11 दिवस पाऊस झाला. 1 ऑगस्टला 39 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

48 तासांत पावसाची शक्यता : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 48 तासांत पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्य भारतावर आद्र्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे दिवसा उष्णतेचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे अशी माहिती एमजीएमच्या खगोलशास्त्रीय केद्राचे संचालक र्शीनिवास औंधकर यांनी दिली.

जिल्ह्यातील 13 मंडळांत कमी पाऊस
जिल्ह्यातल्या 65 पैकी 13 मंडळांमध्ये कमी पाऊस झाला असून, त्याची सरासरी 65 टक्के आहे. यामध्ये पैठण तालुक्यातील नांदरमध्ये 30 टक्के 146 मिमी पाऊस झाला. लोहगाव 162 (34) टक्के, ढोरकीन 60 टक्के पिंपळवाडी 61 टक्के, वैजापूर तालु्क्यातील लाडगाव 204 मिमी ( 58 टक्के), गंगापूर तुर्काबाद 232(54) मांजरी (57) शेंदूरवादा (64 ) टक्के पाऊस झाला.