आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; महाराष्ट्रात १२ सप्टेंबरपासून पावसाचे पुनरागमन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जून-जुलैमध्येचांगली हजेरी लावणारा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून गायब आहे. आता नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या पावसाने राजस्थान मध्य प्रदेशाची वेस ओलांडली अाहे.

महाराष्ट्रात १२ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल तो ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. परतीचा पाऊस रब्बी हंगाम तसेच धरणे भरण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, नैऋत्य मोसमी पावसाचे सर्व गणित हवेच्या दाबावर चालते. जून -जुलै मध्ये दक्षिण भारतात हवेचा दाब योग्य राहिल्याने महाराष्ट्रात सर्वच विभागात चांगला पाऊस झाला. सध्या नैऋत्य मान्सून उत्तर भारतात जास्त सक्रीय आहे. तेथे हवेच्या दाबाची समीकरणे योग्य रितीने जुळत असल्याने तिकडे पाऊस होत आहे. आता मान्सूनने परतीच्या प्रवासाची वाट धरली आहे. महाराष्ट्रात मान्सून अनुकूल वर्षात परतीचा चांगला पाऊस होतो, असा आजवरचा अनुभव आहे. राज्यात पुढील आठवड्यात परतीचा पाऊस सूरू होईल. हा पाऊस चांगला होणार असून महाराष्ट्रात सरासरीइचका पाऊस यंदा होऊल असे एकंदरीत चित्र आहे.

१५ सप्टेंबरपासून पुनरागमन :
डॉ. साबळे यांनी सांगितले, राज्यात १५ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस जोर धरेल. त्यानंतर पाच -सहा दिवस पाऊस नंतर चार -पाच दिवस निरभ्र आकाश असे चित्र ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत राहील. चांगला जोरदार पाऊस नंतर चार दिवस खंड नंतर पुन्हा जोरदार पाऊस या मुळे धरणे भरण्यास मदत होईल.

रब्बीसाठी उपयुक्त :
महाराष्ट्रात रब्बी हंगाम महत्त्वाचा मानला जातो. परतीचा पा ऊस चांगला झाला तर रब्बी हंगाम चांगला साधतो. गेल्या तीन वर्षांपासून रब्बीत शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. यंदा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये चांगला पाऊस झाल्यास राज्यात रब्बी हंगामाला चांगला फायदा होणार असे मानले जात आहे.

काही तालुक्यांना फटका
>मान्सूनच्या परतीच्याप्रवासात हवेच्या दाबाची समीकरणे कशी जुळून येतात यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्यात पाऊस सरासरी गाठणार असला तरी काही दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांत पावसाची तूट राहील.
-डॉ.रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

ला निना न्यूट्रल
सध्याला निना सर्वसाधारण (न्यूट्रल) स्थितीत आहे. परतीचा पाऊस आता राज्यात दाखल होईल. पुढील आठवड्यात १२ सप्टेंबरपासून राज्यात चांगला पाऊस होईल. हा पाऊस नोव्हेंबरपर्यंत राहील.
-डॉ.श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम, खगोल संशोधन केंद्र, नांदेड,.
बातम्या आणखी आहेत...