आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ला निना’चा दिलासा, पुढील वर्षीही धो धो; मार्च-एप्रिल ठरवणार पावसाचे प्रमाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा सर्वत्र धो धो बरसणारा नैऋत्य मोसमी पाऊस पुढील वर्षीही मेहेरबान राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमेरिकेच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील वर्षी मे ते जुलै या काळात ला निना सक्रिय राहणार अाहे. तर मार्च एप्रिलमधील वातावरण कसे राहते यावर पुढील वर्षाचे पर्जन्यमान अवलंबून असल्याचे मत देशातील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेच्या इंटरनॅशनल रिसर्च इंस्टिट्यूट फॉर क्लायमेट अँड सोसायटीने नोव्हेंबर २०१६ ते जुलै २०१७ या काळातील ला निना, अल निनो प्रशांत महासागराचे तापमान या विषयीचा अंदाज नुकताच जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, पुढील वर्षी मे - जून या काळात ला निनाचे प्रमाण २३ टक्के, तर जून-जुलैमध्ये २० टक्के राहील तर अल निनोच्या सक्रीयतेचे प्रमाण १८ टक्के राहील. याच काळात प्रशांत महासागराचे तापमान सर्वसाधारण स्थितीत राहण्याची शक्यता ५९ टक्के आहे. याचाच अर्थ भारतात या काळात चांगला पाऊस होईल. यंदाच्या पावसाळ्याच्या शेवटी अशीच स्थिती होती. त्यामुळे देशात चांगला पाऊस झाला .

पावसाची शक्यता
आगामी पंधरवडा ढगाळ हवामानाचा आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात तीन नोव्हेंबरपर्यंत ढगाळ हवामान राहील. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या भागात नोव्हंेबरपर्यंत हलक्या पावसाची शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तवली.

चक्रीवादळाचा धोका
डॉ. साबळे यांनी सांगितले, नुकतेच एक चक्रीवादळ येऊन गेले आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. आजवरच्या अनुभवानुसार चक्रीवादळाचा मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. चक्रीवादळे आल्यास भारतात येणाऱ्या मोसमी वाऱ्यावर परिणाम होऊन पावसाचे प्रमाण घटते.

ला निना, अल निनोचे प्रमाण
महिनाला निना सामान्य अल निनो

नोव्हे ते जाने ६०%३९% ०१%
डिसेंते फेब्रु ५४%४४% ०२%
मार्चते मे २८%५८% १४%
एप्रिलते जून २३%५९% १८%
मेते जुलै २०%५८% २२%

एप्रिलच्या वातावरणावर भिस्त
हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, पुढील वर्षाच्या पावसाचे अचूक भाकीत आताच करणे थोडे धाडसाचे राहील. कारण मार्च- एप्रिल २०१७ या काळात वातावरण कसे राहते यावर बरेच काही अवलंबून आहे. या काळात मान्सूनला अनुकूल हवामान राहिले तर यंदाप्रमाणेच धो धो पाऊस होईल.
बातम्या आणखी आहेत...