आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पाऊस दाेन दिवसांत परतणार, हवामानशास्त्र खात्यासह तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदा लवकर सुरुवात करणारा मान्सून नंतर मात्र रखडल्याचे चित्र आहे. भरवशाचा जुलै कोरडा गेल्यानंतर ऑगस्टमध्ये मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. दडी मारलेला मान्सून दोन दिवसांत राज्यात पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामानशास्त्र खात्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या हंगामात आतापर्यंत पावसाने मराठवाडा, विदर्भ खान्देशात मोठी तूट नोंदवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक हजेरी लावली आहे. राज्याला आता परतीच्या पावसाच्या आशा आहेत. राज्यात आतापर्यंत पडलेल्या पावसानुसार सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भ तसेच परभणी, जळगाव, हिंगोली या जिल्ह्यांत झाली आहे.

राज्यात विदर्भातील धरणांत सर्वात कमी पाणीसाठा आहे. यंदाच्या हंगामात नैऋत्य मान्सूनची राज्यातील अातापर्यंतची वाटचाल खंडित स्वरूपाची राहिली. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात विदर्भ वगळता राज्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली. जुलै कोरडा गेला. त्यानंतर ऑगस्टमध्ये मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला. मात्र या वेळी पश्चिम महाराष्ट्र काही प्रमाणात मराठवाडा वगळता इतरत्र फारसा पाऊस झाला नाही. परिणामी विदर्भ, खान्देशमध्ये पावसाची मोठी तूट आली. अातापर्यंत झालेल्या पावसानुसार विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ते ३८ टक्क्यांपर्यंत तूट आली आहे. खान्देशातील जळगाव जिल्ह्यात २१ टक्के, धुळे टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात १० टक्के पाऊस कमी झाला आहे. ऑगस्टमध्ये हजेरी लावणाऱ्या पावसात २५ ऑगस्टपासून पुन्हा खंड पडला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

विदर्भात २७ टक्के, मराठवाड्यात १० टक्के तूट
एकजून ते पाच सप्टेंबर २०१७ या काळात झालेल्या पावसानुसार विदर्भात सर्वाधिक २७ टक्के तूट नोंदवण्यात आली. 

सर्वात कमी पावसाचे जिल्हे
विदर्भातीलसर्वच जिल्ह्यांत पावसाने तूट नोंदवली आहे. अातापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात ३७ टक्के कमी पाऊस झाला आहे. अकोला २५, अमरावती ३४, भंडारा २८, बुलडाणा ११, चंद्रपूर गोंदिया ३६, वाशीम ३०, वर्धा २२, गडचिरोली २५ नागपूर जिल्ह्यात टक्के कमी पाऊस झाला. 

पुणेवेधशाळेचा अंदाज 
7 सप्टें 8. : मध्यमहाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 
9 व 10 सप्टें. : मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर राज्यात तुरळक पाऊस शक्य. 

१२ ते १३ तारखेपर्यंत पाऊस 
एक-दोनदिवसांतपावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद, नांदेड, लातूर भागात सप्टेंबरपर्यंत तर मराठवाड्याच्या उर्वरित भागांत त्यानंतर पाऊस होईल. हा पाऊस १२ ते १३ सप्टेंबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. 
- श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ संशोधन केंद्र 
बातम्या आणखी आहेत...