आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: औरंगाबादच्या तुलनेत नाशिकच्या महिलांत अॅनिमियाचे प्रमाण जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नाशिकच्या तुलनेत औरंगाबादेतील पुरुषांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त अाहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील स्त्रियांपेक्षा (१५-४९ वयोगट) नाशकातील महिलांमध्ये  अॅनिमियाचे  प्रमाण अधिक असल्याचेही आढळले आहे. दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण भागात महिला, मुले, पुरुषांत अॅनिमियाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे अहवाल सांगतो.  

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे सर्वेक्षण घेण्यात आले होते. यात जिल्हा मुख्यालय असणाऱ्या शहरातील १५ ते ४९ वयोगटातील महिला व पुरुषांचे सर्वेक्षण झाले. यात लोकसंख्या, प्रत्येक कुटुंबाचे राहणीमान, साक्षरता, वैवाहिक स्थिती, कुटुंब कल्याण, गरोदरपणातील काळजी, बाळंतपणातील काळजी, मुलांतील आजार-विकारांचे प्रमाण, मुलांचे पोषण व आहार, प्रौढांतील रक्तदाब, मधुमेह व कर्करोगाचे प्रमाण याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार औरंगाबाद शहरातील पुरुषांत अॅनिमियाचे प्रमाण नाशिक शहरातील पुरुषांच्या सहा टक्के जास्त असल्याचे आढळून आले आहे, तर नाशिक शहरातील महिलांत  अॅनिमियाचे प्रमाण औरंगाबाद शहरातील महिलांपेक्षा १० टक्क्यांनी जास्त असल्याचे अहवाल सांगतो.

औरंगाबाद जिल्ह्यातील मुलांमध्ये (६ ते ५९ महिने) अॅनिमियाचे प्रमाण ३८.३ टक्के तर नाशिक जिल्ह्यात हेच प्रमाण ५२.९ टक्के आहे.

अॅनिमिया म्हणजे काय  
अॅनिमिया हा विकार रक्ताल्पता, पंडुरोग, रक्तक्षीणता, अरक्तता अशा नावांनीही ओळखला जातो. या विकारात रक्तातील तांबड्या पेशींची संख्या कमी होते. तसेच या पेशीतील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. अॅनिमियाचे अनेक प्रकार आहेत. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा, जीवनसत्त्व बी-१२ च्या कमतरतेमुळे होणारा, फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे होणारा तसेच अानुवंशिक कारणाने (सिकल सेल, थॅलिसेमिया) होणारा अॅनिमिया.
बातम्या आणखी आहेत...