आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - अपु-या शिक्षणामुळे मुस्लिम समाज मागास झाला आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शिक्षणास प्राधान्य देऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. शैक्षणिक प्रगतीनंतरच मुस्लिम बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपला विकास करू शकतील, असे मत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना मोहंमद वली रहमानी यांनी व्यक्त केले.
जटवाडा येथील एव्हरेस्ट अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी (29 डिसेंबर) ‘मुस्लिम समाजातील समस्या, आव्हाने व त्यावरील ठोस उपाय’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्याप्रसंगी रहमानी बोलत होते. या वेळी डॉ. अ. गफ्फार कादरी, कार्यक्रमाचे संयोजक मौलाना महेफुजूर रहेमान, सुरजितसिंग खुंगर, मौलाना रियाजोद्दीन फारूकी, मौलाना अब्दुल रशीद मदनी, डॉ. तय्यब बुखारी, अजमल खान, युनूस पटेल, इसाक पटेल, डॉ.रजवी, सय्यद हुसैन, खाजा मोईनोद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. मौलाना रहमानी म्हणाले,
पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासोबत सांस्कृतिक आणि सभ्यतेची शिकवण देणे गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होऊ शकत नाही.
बायजीपु-यातील अन्वारूल उलूम मदरसा येथेही रहमानी यांचे व्याख्यान झाले. मुस्लिम विद्यार्थ्यांनी कोणत्याही भाषेचे शिक्षण घ्यावे. सोबत इस्लामिक संस्कृतीचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या वेळी मौलाना डॉ. सदरूल हसन नदवी, मुफ्ती मोईजोद्दीन कासमी, मौलाना महेफुजूर रहेमान, मौलाना नसीम मिफ्ताही, डॉ.जहीर अब्दुल वहाब कुरैशी, डॉ. शेख सलीम, सय्यद रफत हुसैन आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.