आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी हजारो, रेल्वे चार, औरंगाबाद-मुंबई नवी रेल्वे हवीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - आैरंगाबाद व मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रवासी हजारो व रेल्वेंची संख्या दररोज चार. एसटी महामंडळाची तुटपुंजी सेवा व खासगी वाहतुकीचे आभाळाला भिडलेले दर यामुळे रेल्वेचे प्रवासाला असणारे पर्यायही तोकडे आहेत. त्यातच जनशताब्दी एक्सप्रेस वगळता इतर सर्व रेल्वे बाहेरून येत असल्याने औरंगाबादच्या प्रवाशांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवाशांची संख्या हजारांत आणि रेल्वे मात्र चार ते सहा, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मुंबई भी दूर.. असा अनुभव दररोजच येत आहे. हे टाळण्यासाठी व मराठवाड्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता नांदेड-मुंबई नवी रात्रीची रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक आहे.

विस्तार झाला, गैरसोय वाढली
प्रारंभी नांदेडहून धावणाऱ्या गाड्यांचा काही वर्षांपूर्वी विस्तार झाला. नांदेड-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर-मुंबई झाली. नांदेड-मुंबई देवगिरी एक्सप्रेस सिकंदराबाद-मुंबई झाली. लातूर-मुंबई एक्सप्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत झाला, गाडी आैरंगाबाद ऐवजी उस्मानाबाद मार्गे झाली. आैरंगाबादकरांची गैरसोय वाढली.

नवीन रेल्वे कशासाठी
- नवीन रेल्वे सुरू झाल्यास १००० ते १२०० प्रवाशांना दिलासा मिळेल.
- वार्षिक सरासरी दररोज ३०० ते ५०० प्रवाशी वेटिंगवर असतात.
- आैरंगाबाद येथून जाणाऱ्या गाड्यांचा विस्तार, प्रवाशांना सामावून घेणाऱ्या पर्यायाचा अभाव
- सध्या नंदीग्राम, देवगिरीचे आरक्षण मिळत नाही, नव्या रेल्वेमुळे ही अडचण दूर होईल
- आता जनशताब्दी जालन्याहून सुटेल, त्यामुळे औरंगाबादकरांची होणारी गैरसोय टळेल.