आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादपेक्षा नाशकात आत्महत्यांचे प्रमाण जास्त, राष्ट्रीय गुन्हे अन्वेषणच्या अहवालातील माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विविध कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण औरंगाबादच्या  तुलनेत नाशिकमध्ये जास्त असल्याचे आढळले आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषणच्या अहवालात ही सर्व माहिती देण्यात आली आहे. या अहवालात  २००९ ते २०१४ या काळात या दोन शहरांत विविध कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या देण्यात आली आहे. या अहवालात देशातील प्रमुख शहरांतील आत्महत्या करणारे व त्यामागील कारणे यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.  

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने नुकताच हा अहवाल प्रकाशित केला आहे. दिवाळखोरी, कर्जबाजारीपणा, अाजारीपणा, जवळच्या व्यक्तीचे निधन, हुंड्यासाठी  छळ, प्रेमप्रकरण., दारिद्र्य, संपत्तीचा वाद, बेरोजगारी, व्यसनाधीनता, परीक्षेतील अपयश, सामाजिक अवमान, कौटुंबिक समस्या, इतर व अज्ञात आदी कारणांचा  यात समावेश आहे. या विविध कारणांमुळे २०१२ मध्ये औरंगाबादेत १३५ जणांनी आत्महत्या केल्या, तर याच वर्षात नाशिकमध्ये हे प्रमाण २६१ इतके होते. औरंगाबादेत २०१३ मध्ये २०२ जणांनी तर नाशकात २८२ जणांनी आत्महत्या केल्या. नाशिकमध्ये २०१४ मध्ये २७५ जणांनी तर औरंगाबादेत याच काळात १४७ जणांनी आत्महत्या केल्या.  
बातम्या आणखी आहेत...