आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत कॉपी प्रकरणे जास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दरवर्षी कॉपीची सर्वाधिक प्रकरणे बीड जिल्ह्यात होतात. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी निकालात सर्वाधिक कॉपी प्रकरणे औरंगाबाद जिल्ह्यातच असल्याचे उघड झाले आहे. कॉपीमुळे बोर्डाने जिल्ह्यातील १२४ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.
बारावी परीक्षेत शाळांचा निकाल चांगला लागावा, गुणवत्ता वाढावी म्हणून बोर्डातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवले जाते. मात्र, काही ठिकाणी अद्यापही कॉपीमुक्तीचा हवा तो परिणाम दिसून येत नाही. फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांविरुद्ध औरंगाबाद विभागीय मंडळाने कारवाई केली होती. २०१५ मध्ये झालेल्या परीक्षेत मात्र कॉपी प्रकरणांत वाढ दिसून आली. एकूण १२४ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. सध्या या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे निकालही राखून ठेवण्यात आले आहेत. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्याच्या परीक्षेत अपात्र ठरवले जाणार असून त्यांना पुढील एका परीक्षेला बसण्यास बंदी घातली जाईल, अशी माहिती विभागीय सचिव प्र. श. पठारे यांनी दिली.
या परीक्षेच्या वेळी दहा मिनिटेअगोदर प्रश्नपत्रिका आणि दहा मिनिटेअगोदर उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेऊन पेपर सोडवण्यास मदत झाली. असे असले तरी कॉपीमुक्तीसाठी कडक मोहीम राबवणाऱ्या औरंगाबाद विभागीय मंडळाबरोबरच महसूल विभागाने नंतर कॉपीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा कॉपीचे प्रकार पुन्हा समोर येत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.
कॉपी केसेसमधील मंडळाची आकडेवारी
लातूर
०६
मुंबई
२३
नाशिक
६२
पुणे
८८
नागपूर
१११
औरंगाबाद
१२४

२०१५ मध्ये
६२ विद्यार्थ्यांविरुद्ध औरंगाबाद विभागीय मंडळाने कारवाई
२०१४ मध्ये
१२४ विद्यार्थी कॉपी करताना आढळले
बातम्या आणखी आहेत...