आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than Third Thousand Crore Liters Water Wasted

तिस हजार कोटींपेक्षा अधिक लिटर पाणी गेले वाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद मनपाने - 2013 च्या मान्सूनपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला होता. त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्पात 30 लाखांची केलेली तरतूदही कागदावरच राहिली. त्यामुळे 30 हजार कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी नाल्याद्वारे वाहून गेले. लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जलपुनर्भरणाकडे दुर्लक्ष होत आहे.


यंदाच्या पावसाने मागील चार वर्षांचा विक्रम मोडून काढला. 2010 मध्ये 761.8 मि.मी. पाऊस पडला होता. त्या तुलनेत 2013 मध्ये जून ते नोव्हेंबरपर्यंत 780 मि.मी. विक्रमी पाऊस झाला. पावसाने शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वार्षिक सरासरी ओलांडली आहे. वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाण्याचे फेरभरण करून शहरातील जलपातळी उंचावण्याची नामी संधी महापालिकेने गमावली आहे. एकीकडे विक्रमी पर्जन्यमान तर दुसरीकडे डिसेंबरपर्यंत पाऊस पडूनही शहरातील गुंठेवारी भागात टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे.

जूनपर्यंत अंमलबजावणी
वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. हे ओळखूनच अर्थसंकल्पात 30 लाखांची तरतूद केली. मात्र अनेक अडचणींमुळे हार्वेस्टिंगचे काम होऊ शकले नाही. तथापि, 2014 मध्ये मान्सूनपूर्व काळात प्रत्येक वॉर्डातील खुल्या जागेवर, मनपा कार्यालय, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या घरावर वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. -कला ओझा, महापौर, मनपा.

पर्जन्यमान कमी आणि पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी जलस्रोतातून पाण्याचा वारेमाप उपसा करण्यात येतो, पण त्या तुलनेत जलपुनर्भरण अत्यल्प करण्यात येत असल्याने भूगर्भातील पाणी पातळीत कमालीची घट होते. जलस्रोत कोरडे पडतात. याचे भान ठेवून सर्वांनी आता तरी वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची गरज आहे. -विजय केडिया, जलतज्ज्ञ.